tata safari 2021 | नवीन टाटा सफारी लाँच; किमतीवरील पडदाही हटला

प्रणित पवार
Monday, 22 February 2021

टाटा मोटर्सची गेल्या दोन दशकांपासून लोकप्रिय ठरलेल्या आणि 2021मध्ये नव्या ढंगात लाँच केलेल्या टाटा सफारीच्या किमतीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. सोमवारी (ता. 22) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

मुंबई : टाटा मोटर्सची गेल्या दोन दशकांपासून लोकप्रिय ठरलेल्या आणि 2021मध्ये नव्या ढंगात लाँच केलेल्या टाटा सफारीच्या किमतीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. सोमवारी (ता. 22) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. 6 आणि 7 आसनी टाटा सफारी 14.69 लाखांपासून (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) उपलब्ध होणार आहे. सफारील XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ आदी सहा व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ऑटोमेटिक ट्रान्समिशनसोबत सफारी 14.8 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सफारीमध्ये शक्तिशाली 2.0 लिटर टर्बोचार्ज कायरोटेक इंजिन देण्यात आले आहे जे 170 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. सफारीत सिग्‍नेचर ऑयस्‍टर व्‍हाईट इंटीरिअर, तसेच अॅशवूड फिनिश डॅशबोर्ड, पॅनोरॅमिक सनरूफ, 8.8 इंच फ्लोटिंग आयलँड इंफोटेन्‍मेंट सिस्‍टम देण्यात आला आहे. तसेच इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सिस्टिमही देण्यात आली आहे. डेटोना ग्रे, ट्रॉपिकल मिस्‍ट व ऑर्कस व्‍हाईट्सह सिग्‍नेचर रॉयल ब्‍ल्‍यू या अतिरिक्‍त रंगांमध्‍ये सफारी उपलब्‍ध अाहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

टाटा सफारी ओमेगा आर्किटेक्चरवर आधारित असून ती इम्पॅक्ट 2.0 जिझाइन लँग्वेजवर तयार केली आहे. ओमेगा आर्किटेक्चरला लँड रोव्हरसाठी डी8 प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आले आहे. टाटा हॅरियरमध्येही याचा वापर करण्यात आला आहे. 26 जानेवारीला घोषणा झालेल्या नवीन टाटा सफारीची बुकिंग आधीच सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या डिलरशीपकडून 30 हजार रुपयांच्या टोकन किमतीवर या सफारीला बुक करता येऊ शकते.

सफारी 'अॅडव्हेंचर'ही बाजारात
टाटा मोटर्सने प्रभावी लूकसह सफारीचे 'अॅडव्हेंचर' मॉडेलही XZ+ मध्ये बाजारात आणले आहे. निसर्गातून प्रेरणा घेत 'ट्रॉपिकल मिस्‍ट' रंगामध्‍ये ही सफारी उपलब्‍ध असून मँन्युअल ट्रान्समिशनची किंमत 20.20 तर ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह 21.45 लाखात उपलब्ध आहे. .

टाटा सफारीची मॉडेलनुसार किंमत
XE : 14.69 लाख रुपये
XM : 16लाख रुपये
XT : 17.45 लाख रुपये
XT+ : 18.25 लाख रुपये
XZ  : 19.15लाख रुपये
XZ+ : 19.99 लाख रुपये (6 आणि 7 सीटर)

----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai marathi lifestyle updates tata safari 2021 launchlive automobile market updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi lifestyle updates tata safari 2021 launchlive automobile market updates