
मुंबई कधीही शांत झोपत नाही असं म्हटलं जातं. सकाळ असो वा रात्र ही मायानगरी कायम धावत असते. त्यामुळे या शहराविषयी अनेकांना कुतुहल आहे. त्यातच येथील नाईट लाइफ हा विषय तर अनेकांच्या चर्चांमध्येही रंगतो. मुंबईची नाईट लाइफ एकदा तरी जगता यावी अशी अनेकांची इच्छा असते. मुंबईत रात्र झाली की पब, बार सुरु होतात. त्यामुळे या ठिकाणांची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. मुंबईमध्ये अनेक बार असून यातील काही बार हे खास लोकप्रिय आहेत. त्यामुळेच मुंबईतील अंधेरी, वांद्रे या सारख्या भागातील लोकप्रिय आणि फेमस बार कोणते ते पाहुयात.
१. जनता लंच होम -
या बारच्या नावावर जाऊ नका. हा बार खासकरुन तेथील उत्तम प्रतीचं जेवण आणि ड्रिंक्ससाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे शनिवार-रविवार येथे तरुणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. वांद्रे येथे असलेल्या या बारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स उपलब्ध आहेत. यात खासकरुन बिअर, रम, व्हिस्की जास्त लोकप्रिय आहेत. तसंच येथील भारतीय पदार्थ, चायनीज हे पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत. हा बार सकाळी ११ ते उशीरापर्यंत सुरु असतो.
२. बॉम्बे कॉकटेल बार -
जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मद्य ट्राय करायची सवय असेल तर हा बार एक बेस्ट ऑप्शन आहे. येथे मद्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अंधेरी वेस्टमध्ये असलेला हा बार संध्याकाळी ७ ते रात्री उशीरापर्यंत सुरु असतो. तसंच साधारणपणे दोन जणांसाठी २,५०० याची एण्ट्री फी असल्याचं सांगण्यात येतं.
३. R’Adda -
मुंबईत राहून जर तुम्हाला विदेशातील बारमध्ये बसण्याचा फील हवा असेल तर हा बार बेस्ट ऑप्शन आहे. परंतु, यात भारतीय शैलीचादेखील थोडासा अनुभव घ्यायला मिळतो. मुंबईतील जुहू येथे हा बार असून तो संध्याकाळी ७ ते रात्री १.३० पर्यंत सुरु असतो.
४. Gateway Taproom -
हा बार खासकरुन त्याच्या इंटेरिअरसाठी लोकप्रिय आहे. या बारची अत्यंत सुंदररित्या रचना करण्यात आली आहे. मद्याची प्रत्येक बाटली येथे उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही गेलात तर या जागेच्या प्रेमात पडाल. बीकेसी येथे असलेला हा बार दुपारी १२ ते रात्री उशीरापर्यंत सुरु असतो.
५. The Liquor Factory -
अंधेरीमधील आणखीन एक लोकप्रिय बार म्हणजे The Liquor Factory. हा बारदेखील तेथील इंटेरिअरसाठीच लोकप्रिय आहे. उंच भिंती, जुन्या काळातील घड्याळ आणि जुन्या मॉडेलच्या सायकली अशा अनेक जुन्या गोष्टींचा संग्रह करुन या बारचं इंटेरिअर करण्यात आलं आहे. या बारमधील व्हिस्की, रम बेस कॉकटेल जास्त लोकप्रिय आहे. तसंच जेवणात येथे पास्ता, भारतीय डिश, चिकन बैदा, चिकन कोलीवाडा हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. अंधेरी वेस्टमध्ये हा बार असून दोन जणांसाठी १,५०० रुपये येथे आकारले जातात.
६.Toto’s Garage -
रॉक म्युझिक, लाइटचा मंद प्रकाश, मद्याचे विविध प्रकार अशा ८० च्या दशकातील थीम असलेला हा एक लोकप्रिय बार आहे. या बारमध्ये शनिवार-रविवार जास्त गर्दी असते. त्यामुळे इथे जाण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंग करावी लागते. वांदे वेस्टमध्ये हा बार असून तो संध्याकाळी ६ ते रात्री १२.३० पर्यंत सुरु असतो.
७. Bar Bar -
कुर्ला येथे असलेला हा बार खासकरुन त्याच्या कमी किंमतीमुळे लोकप्रिय आहे. येथे मद्याचे अनेक प्रकार असून ते अत्यंत माफक दरात मिळतात. या बारमध्ये जाण्यासाठी केवळ ८०० रुपये आकारले जातात. हा बार दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत सुरु असतो.
८. Asiad -
जर ऑफिस सुटल्यावर थेट पार्टी करण्याचा तुमचा मूड असेल तर Asiad हा बेस्ट ऑप्शन आहे. हा बार येथील मद्य आणि खासकरुन स्नॅक्ससाठी ओळखला जातो. तसंच येथे मद्याचे दरही कमी आहेत. विलेपार्ले येथे हा बार असून तो सकाळी ११ पासून रात्री उशीरापर्यंत सुरु असतो. तसंच येथे जाण्यासाठी केवळ ७५० रुपयेच भरावे लागतात.
(या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे. मद्यपान किंवा धुम्रपान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नाही. त्यामुळे या सगळ्याचा 'सकाळ ऑनलाइन'शी कोणताही संबंध नाही. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.