Cancer Therapy : कॅन्सरचा प्रसार रोखणे होणार शक्य, टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी शोधली खास थेरपी

Cancer Therapy : कॅन्सर या आजारावर आधुनिक उपचार पद्धती विकसित होत आहे. नुकतीच मुंबईच्या टाटा मेमोरिअल सेंटरच्या काही डॉक्टरांनी कर्करोगाच्या मेटास्टेसिससाठी एक विशेष थेरपी शोधली आहे.
Cancer Therapy
Cancer Therapyesakal

Cancer Therapy : कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. या आजारामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. मात्र, या आजाराचे लवकर निदान झाले आणि यावर वेळीच उपचार झाले तर या आजारावर सहज मात केली जाऊ शकते.

दिवसेंदिवस या आजारावर आधुनिक उपचार पद्धती विकसित होत आहेत. नुकतीच मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांनी कर्करोगाच्या मेटास्टेसिससाठी एक विशेष थेरपी शोधली आहे.

या थेरपीद्वारे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी न्यूट्रास्युटिकल थेरपी विकसित करण्यात आली आहे. दशकभरात चाललेल्या संशोधनानुसार, कर्करोगाच्या पेशी या मरणाऱ्या क्रोमोसोम फ्रॅगमेंट्सला (क्रोमॅटिन) मागे सोडतात. ज्या कधीकधी निरोगी पेशींसोबत एकत्र होतात आणि नवीन ट्यूमर बनवतात.

न्युट्रास्युटिकल हे एक प्रकारचे अन्न उत्पादन किंवा अन्न आहे. जे मूलभूत पोषणाच्या पलीकडे जाऊन तुमच्या शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळवून देते. हे अनेकदा अतिरिक्त औषधी गुणधर्मांमुळे किंवा बायोअ‍ॅक्टिव्ह संयुगांमुळे होते.

Cancer Therapy
Cancer Free : स्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे कर्करोगमुक्त झाला भारतातील पहिला रूग्ण, उपचारांचा खर्च ४ कोटींवरून आला ४० लाखांवर

संशोधनातून केमो-रेडिओथेरपीचे धोके समोर आले

या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. इंद्रनील मित्रा यांनी या थेरपीसंदर्भात सोमवारी माध्यमांशी बातचीत केली. मित्रा म्हणाले की, जरी अनेक रूग्ण कर्करोगातून बरे होत असले तरी, आमच्या संशोधनामध्ये (अभ्यासामध्ये) सध्याच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट असलेल्या जोखीम किंवा धोक्यांचा समावेश आहे.

कर्करोगावरील थेरपी केमोथेरपी आणि रेडिओथेरपी या दोन्ही थेरपी प्राथमिक ट्यूमरच्या पेशी नष्ट करतात. या पेशी मरणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना क्रोमॅटिन सोडण्यास कारणीभूत ठरतात. ज्याला cfChPs असे म्हटले जाते, जे रक्ताद्वारे शरीरात इतरत्र निरोगी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्या भागात कर्करोग उद्भवू शकतो, असे मित्रा यांनी सांगितले.

सीएफसीएचपीवरील पुढील चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, तांबे आणि वनस्पती (द्राक्षे किंवा जांभूळ) पासून बनवलेले न्यूट्रास्युटिकल हे पेशींना निष्क्रिय करू शकते आणि मेटास्टेसिसचा धोका कमी करू शकते. टाटा मेमोरिअल सेंटरने औषध निर्मितीसाठी न्यूट्रास्युटिकल उत्पादक कंपनीशी करार केला आहे. हे औषध केमोथेरपीसह अतिरिक्त उपचार म्हणून निर्धारित केले जाऊ शकते.

मित्रा पुढे बोलताना म्हणाले की, कर्करोगाची अशी अनेक प्रकरणे आहेत की, ज्यामध्ये उपचारांचा वापर करून कर्करोगाचा ट्यूमर काढून टाकण्यात आला आहे. मात्र, तरी ही रूग्णाचा कर्करोगाने मृत्यू होतो.

डॉ. मित्रा यांच्या मते, त्यांच्या टीमने मानवी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी उंदरांमध्ये सोडल्या. त्यानंतर, आम्ही प्रथम उंदरांमध्ये वाढलेल्या ट्यूमरवर उपचार केले. मेंदूची बायोप्सी केली आणि तेथे मानवी कर्करोगाच्या पेशींचे सीएफएचपी आढळले. त्यानंतर, केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशनचा वापर करून विविध संशोधनाच्या टेस्ट केल्या आणि असेच परिणाम आढळले.

एका टीमने ट्यूमर असलेल्या उंदरांना न्यूट्रास्युटिकल इंजेक्शन दिले आणि या उंदरांच्या मेंदूच्या बायोप्सीमुळे CFCHP ची निम्न पातळी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com