आईमुळेच स्वप्नांना भरारी

माझी आई मीनाताई ही केवळ आई नसून माझ्या आयुष्याची खरी प्रेरणा, शिक्षक आणि आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.
My Mother My World
My Mother My World Sakal
Updated on

विदिशा श्रीवास्तव - अभिनेत्री

माझ्यासाठी आई म्हणजे केवळ एक नातं नाही, तर ती माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा आधार आहे. माझी आई मीना, ही केवळ माझी जन्मदात्री नाही, तर ती माझी खरी गुरू, प्रेरणा आणि माझ्या जीवनाचा मुख्य आधार आहे. तिच्या मायेच्या छायेखालीच मी आणि माझी धाकटी बहीण शान्वी सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगलो आहोत. तिच्या प्रत्येक बोलण्यात, हावभावात आणि कृतीत प्रेमाची झळाळी आहे. ती आमच्यासाठी आईबरोबरच आमची पहिली शिक्षिका, मार्गदर्शक आणि संकटात धीर देणारी सावलीही आहे. आईच्या उपस्थितीनं घरातील प्रत्येक गोष्ट अधिक सुंदर वाटते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे घरात कायम आनंदाचं आणि सकारात्मकतेचं वातावरण राहतं. तिनं आम्हाला शिकवलं, की जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त कष्टच नाही, तर चांगले विचार, नि:स्वार्थ प्रेम आणि माणुसकी असणंही गरजेचं आहे. तिच्या मोलाच्या शिकवणीमुळेच आम्ही दोघी बहिणी खंबीरपणे उभ्या राहू शकलो आणि आमची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकलो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com