- मृण्मयी गोंधळेकर, अभिनेत्री
‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी,’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. खरंतर ही फक्त म्हण नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील सत्य आहे. माझ्यासाठी, माझी आई म्हणजेच माझं संपूर्ण विश्व आहे. माझं अस्तित्व तिच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. तिच्या अनुपस्थितीत माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही.