
नाग पंचमीला नागदेवांना दूध, हळद अर्पण करून शुभेच्छा संदेश पाठवा.
नागदेवतेच्या कृपेने सुख-शांती लाभो! असे संदेश नातेवाईकांना पाठवा.
नाग पंचमीच्या शुभेच्छांसह सर्पदोष निवारणासाठी मंत्रजप आणि पूजा करा.
Nag Panchami 2025 Marathi wishes for family: यंदा २९ जुलैरोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक ठिकाणी नागांची पूजा केली जाते. नागदेवताला प्रसन्न कल्याने भगवान शिवप्रभुदेखील प्रसन्न होतात. तसेच सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. देशभरात विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. अनेकांच्या घरात नागाचे चित्र काढतात आणि पूजा करतात. नागपंचमीच्या या शुभ मुहूर्तावर नातेवाईकांना मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू हा सण अधिक आनंदी बनवू शकता.