नासाने बनवला ''हा'' खास सुगंधी परफ्यूम , कोणता ? ते वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nasa invents a perfume which smells like space with astronaut help

स्पेस मध्ये जाताना जरूर वापरा खास स्पेसवाला परफ्युम 
नासाने अंतराळवीरांच्या मदतीने, विशेष वासाचा परफ्यूम तयार केला आहे. 

नासाने बनवला ''हा'' खास सुगंधी परफ्यूम , कोणता ? ते वाचा

पृथ्वीच्या बाह्य जागेत सापडणारा एक खास प्रकारचा सुगंध आता लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सीएनएन, केमिस्ट आणि ओमेगा इन्ग्रेडियंट्सचे संस्थापक यांच्यानुसार, स्टीव्ह पियर्स 'इओ डी स्पेस' नावाचे परफ्यूम बनवणार आहेत.

 या परफ्यूममध्ये, अवकाशात सापडलेली सुगंध खासकरून विकसित केली आहे. स्टीव्ह पियर्स या परफ्यूमच्या परफेक्ट सुगंधासाठी २००८ सालापासून या कामामध्ये  व्यस्त होते. हा स्पेसचा परफ्युम कोणती खुशबु देणार यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत. 

''इओ डी स्पेस''चे संस्थापक स्टीव्ह पियर्स यांनी 2008 मध्ये नासाकडे संपर्क साधला आणि नंतर विविध  एजन्सीच्या स्पेस मिशनमध्ये सामील झालेल्या प्रवाश्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला, जेणेकरून तोच स्पेसवाला सुंगध या परफ्युममध्ये भरण्यासाठी.  इतकेच नव्हे तर परफ्युमच्या सुगंधात परिपूर्ण होण्यासाठी त्यांनी या विषयावरील अनेक अंतराळवीरांशी चार वर्षे चर्चा केली.

स्टीव्ह पियर्स यांनी सुंगंधाच्या विषयावर अनेक अंतराळवीरांशी चर्चा केला, जसेकी अंतराच्या बाह्य भागात कोणत्या प्रकारचे सुगंध आढळतो ? अंतराळवीरांनी सांगितले की अंतराळातील सुगंध "गनपाउडर, सायर स्टीक, रास्पबेरी आणि रम यांचे मिश्रण आहे."आमची संपूर्ण टीम या परफ्युमसाठी खूप मेहनत घेत आहे. 

 किकस्टार्टर मोहिमेनुसार,"स्पेसचा सुगंध '' सर्वांना माहित असणे गरजेचे असल्याने आता आम्हाला  ते मोठ्या प्रमाणात बनवावे लागेल जेणेकरून प्रत्येकजण तो स्पेसचा सुगंध अनुभवू शकेल."

काही  दिवसांपूर्वी इओ डी स्पेसच्या टीमने एक पोस्ट शेअर केली गेली होती, ज्यामध्ये  म्हटले आहे की या सुगंधाने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि मैथ्समॅटिकस  या विषयातील लोकांची रुची वाढवण्यास उपयोगी होईल. हे नक्की. म्हणजे स्पेसमध्ये न जाताही तेथील खास प्रकारची खुशबू आम नागरिक अनुभवू शकेल.

loading image
go to top