National Girl Child Day 2024 : मुलींच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी अशा प्रकारे वाढवा त्यांचा आत्मविश्वास

भारतात दरवर्षी २४ जानेवारीला 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा केला जातो. देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा या दिनामागचा खास उद्देश आहे.
National Girl Child Day 2024
National Girl Child Day 2024esakal

National Girl Child Day 2024 : भारतात दरवर्षी २४ जानेवारीला 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा केला जातो. देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा या दिनामागचा खास उद्देश आहे. देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

विशेष म्हणजे २४ जानेवारी १९६६ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून दिवंगत इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे, भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आला होता.

महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी २४ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून निवडण्यात आला. खास आजच्या दिनानिमित्त मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठीच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील.

वाढवा मुलींचा आत्मविश्वास

आजकालच्या मुली चांगले शिक्षण घेतात आणि स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. मात्र, अनेकदा असे होते की, उच्च शिक्षण घेऊन देखील काही मुली समाजासमोर किंवा लोकांसमोर मत मांडायला घाबरतात. मुलींना असे वाटते की, समोरची माणसे त्यांच्या बोलण्याची चेष्टा करतील. जेव्हा एखादी मुलगी तिचे मत मांडायला किंवा लोकांसमोर बोलायला घाबरते तेव्हा तिच्यातील आत्मविश्वास हा कमी झालेला असतो.

तुमची ही मुलगी जर बोलायला किंवा काही करायला घाबरत असेल तर सर्वात आधी तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. ती का घाबरतेय? याचे कारण जाणून घ्या. तिला समजून सांगा. तिला तिची कामे स्वबळावर करण्यास सांगा.

मुलींना बनवा स्वावलंबी

आजच्या काळात ज्या प्रमाणे मुलींनी चांगले शिक्षण घेणे जितके आवश्यक आणि गरजेचे आहे. तितकेच त्यांनी शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे हे गरजेचे झाले आहे. मुलींनी केवळ नोकरी मिळवणे नाही तर त्यांनी स्वावलंबी होणे देखील महत्वाचे आहे.

या ठिकाणी मुद्दा केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याचा नाही तर पालकांनी मुलींना गाडी चालवायला, बॅंकेची किंवा व्यवहाराची कामे देखील शिकवायला हवीत. जेणेकरून त्या घरातील कामे, नोकरी आणि इतर ही कामे जबाबदारीने पार पाडू शकतील.

निर्णय घ्यायला शिकवा

अनेक मुलींचे प्रत्येक छोटे-मोठे निर्णय त्यांचे पालक घेतात. अगदी त्यांच्या शाळेपासूनचे ते त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टींचे निर्णय घरातील वडिलधारी मंडळी घेताना दिसतात. मात्र, असे होता कामा नये. प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

तुम्ही देखील तुमच्या मुलीला निर्णय घ्यायला शिकवा. तिला निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिला साथ द्या. जर तिला एखादा निर्णय घेताना काही शंका येत असतील तर पालकांनी तिच्याशी शांतपणे चर्चा करावी आणि तिला तिचा निर्णय घेण्यात मदत करावी.

National Girl Child Day 2024
Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला पांढरा ड्रेस परिधान करायचा आहे? मग, अभिनेत्रींच्या ‘या’ लूक्सपासून घ्या प्रेरणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com