श्रीनिवास रामानुजन यांचं गणितात विलक्षण योगदान

Srinivasa Ramanujan
Srinivasa Ramanujanesakal
Updated on
Summary

गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो.

National Mathematics Day 2021 : भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (Srinivasa Ramanujan) यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. 2012 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' (National Mathematics Day) म्हणून जाहीर केला.

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोइम्बतूरच्या (Coimbatore) इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात (Brahmin Family) झाला. त्यांच्या आईचं नाव कोमलताम्मल आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अयंगार होतं. त्याच्या जन्मानंतर, संपूर्ण कुटुंब कुंभकोणममध्ये गेलं, जिथं त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरवात केली. सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांना वयाच्या तीन वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यात त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळाला. रामानुजन यांना गणित हा विषय खूप आवडत होता. इतर विषयांकडं मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास विद्यापीठाची (Madras University) शिष्यवृत्ती त्यांना गमवावी लागली.

1911 मध्ये त्यांचा 'जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीमध्ये 17 पानाचा एक पेपर प्रकाशित झाला. 1912 मध्ये रामानुजन यांनी 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' मध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रामानुजन यांना त्या काळातील जग प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ 'जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली. हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.

Srinivasa Ramanujan
Srinivasa Ramanujan

महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन हे त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते. यांनी गणितातील विश्लेषणे, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये विलक्षण योगदान दिले. रामानुजन यांनी 3900 हून अधिक गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून त्यांचे नाव शोधण्यापर्यंत, गणितातील त्यांच्या अनेक संशोधनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले. रॉयल सोसायटीचे (Royal Society) सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे पहिले भारतीय ही ठरले रामानुजन ब्रिटनमध्ये असताना ब्रिटनचे थंड व ओलसर हवामान त्यांना मानवले नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खराब झाली आणि 1917 मध्ये त्यांना टीबी झाला. TB या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 रोजी 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Srinivasa Ramanujan
जीना यहाँ मरना यहाँ.. गाण गाऊन 'या' काँग्रेस नेत्यानं दिले राजकीय संकेत
Srinivasa Ramanujan
Srinivasa Ramanujan

भारतातील पाच महान गणितज्ज्ञ

श्रीनिवास रामानुजन : रामानुजन जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले, तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते गणित शिकले आणि आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले. त्यासाठी केंब्रिज विद्यापीठानं त्यांना आमंत्रण धाडलं. रामानुजन यांनी Analytical theory of numbers, Eliptical function आणि Infinite series या विषयांवर अभ्यास केला.

आर्यभट्ट : भारताचे सगळ्यांत पहिले गणितज्ज्ञ आर्यभट्ट यांना मानलं जातं. असं म्हणतात की पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे.

शकुंतला देवी : शकुंतला देवी या भारतातल्या सगळ्यांत प्रसिद्ध महिला गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटलं जायचं.

सी. आर. राव : सी. आर. राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात. कोलकातामध्ये सांख्यिकी विषयात एम.ए.ची पदवी घेतली होती.

सी. एस. शेषाद्री : सी. एस. शेषाद्री यांनी Algebraic Geometry या विषयात खूप काम केलंय. मद्रास विद्यापीठात गणितात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली.

Srinivasa Ramanujan
भाजपाच्या मीनादेवींनी रोखली तृणमूलची लाट

का साजरा केला जातो हा दिवस?

गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईंबतूरच्या इरोड गावात झाला होता. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. भारत सरकारनं त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. वयाच्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं. 2015 मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा 'The Man Who Knew Infinity' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते. दरवरर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com