National Vaccination Day 2024 : राष्ट्रीय लसीकरण दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

National Vaccination Day 2024 : लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशात दरवर्षी १६ मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो.
National Vaccination Day 2024
National Vaccination Day 2024esakal

National Vaccination Day 2024 : मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. खरे तर त्यानंतर लसीकरणाचे महत्व अधिक ठळकपणे दिसून आले. कारण, कोरोनाच्या लसीकरणानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवता आले आणि लोकांचा जीव वाचवता आला. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी लसीकरण किती आवश्यक आहे? याचे महत्व अधिक अधोरेखित झाले.

कोरोनासारखेच इतर अनेक जिवाणू आणि विषाणूंमुळे रोगांचा धोका हा नेहमीच असतो. या रोगांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळते.

या लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशात दरवर्षी १६ मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो.  या दिनाला लसीकरण दिवस असे ही म्हटले जाते. या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त आज आपण या दिनाचा इतिहास आणि महत्व जाणून घेणार आहोत.

National Vaccination Day 2024
HPV Vaccine for Cervical Cancer: 4 प्रकारच्या कॅन्सरसाठी 200 रुपयांचं Vaccine ठरणार वरदान! तज्ज्ञांनी केला खुलासा

राष्ट्रीय लसीकरण दिनाचा इतिहास काय?

भारतात दरवर्षी १६ मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त आरोग्य आणि लसीकरणासंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १६ मार्च १९९५ मध्ये देशात पहिल्यांदाच तोंडातून पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

विशेष म्हणजे याच दिवशी सरकारने भारत देश पोलिओमुक्त करण्यासाठी पल्स पोलिओ मोहिम सुरू केली. या पोलिओ मोहिमेअंतर्गत 0 ते ५ या वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओच्या विरोधात लढण्यासाठी २ थेंब तोंडातून देण्यात आले. ही मोहिम नंतर यशस्वीपणे पार पडली, याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. त्यानंतर, २०१४ मध्ये भारत पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आला असला, तरी आजपर्यंत ही पोलिओ लसीकरणाची मोहिम देशात सुरू आहे.

राष्ट्रीय लसीकरण दिनाचे महत्व

खरं तर लसीकरण हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी महत्वाचे आणि गरजेचे आहे. या राष्ट्रीय लसीकरण दिनाची सुरूवात जरी लहान मुलांच्या लसीकरणाने झाली असली तरी, याचे महत्व सर्व वयोगटातील लोकांना समजणे आणि त्यांनी ते समजून घेणे गरजेचे आहे.

देशात या लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात लसीकरण मोहिम आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण, लसीकरणामुळे आपले अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण होते.

या रोगांपासून बचाव करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. अलिकडच्या काळात कोरोनासारख्या घातक आजारांपासून बचाव करण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लसीकरण केल्याने दरवर्षी सुमारे २-३ दशलक्ष लोकांचे जीवन वाचवण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com