
National Youth Day 2025: दरवर्षी देशभरात १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद तरूणांचे प्रेरणा स्थान आहे. संयुक्त राष्ट्र संगाने १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले होते आणि त्यानंतर बारताने १९८४ मध्ये दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या खास दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात.