Personality Test : काय सांगता.., खुर्चीवर बसण्याच्या सवयीही सांगतात तुमचा स्वभाव!

समुद्रशास्त्रात तुमच्या प्रत्येक सवयीचा अर्थ आणि स्वभाव सांगितलेला आहे. त्यात तुम्ही कसे बसतात याचाही अर्थ सांगितला आहे.
Personality Test using Sitting Habits
Personality Test using Sitting Habitsesakal

Nature Guess of Sitting Habits Through Samudra Shastra : शरीराची ठेवण आणि उठण्या बसण्याच्या पध्दतीवरून तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावातील ठळक गोष्टींचा अंदाज बांधू शकतात असं समुद्रशास्त्र सांगतं.

समुद्रशास्त्रात तुमच्या प्रत्येक सवयीचा अर्थ आणि स्वभाव सांगितलेला आहे. त्यात तुम्ही कसे बसतात याचाही अर्थ सांगितला आहे. तुमची बसण्याची पध्दत ही तुमच्या बॉडी लँग्वेजचा भाग आहे. जाणून घेऊया

  • काही लोक खूर्चीवर बसताना गुडघे एकमेकांना टेकवून तर पंजांमध्ये भरपूर गॅप ठेवून बसतात. असे लोक जबाबदारीपासून पळतात, असं शास्त्रात म्हटलं आहे.

  • जे लोक पाय वरून खुले आणि पंजे, टाचा जोडून बसतात. ते एक आरामदायक जीवन जगतात. फार ताण घेत नाहीत.

Personality Test using Sitting Habits
Personality Test: काय सांगता, तुमच्या मोबाईल धरण्याच्या सवयीवरुनही कळतो स्वभाव...!
  • तुम्ही काही लोकांना पायावर पाय ठेवून, क्रॉस करून बसलेले बघितले असाल. असे लोक फार सर्जनशील असतात. यांचा स्वभाव थोडा लाजाळू आणि विनम्र असतं. जगासमोर मान खाली घालावी लागेल अशा गोष्टी करणं हे लोक टाळतात.

  • जे लोक खुर्चीवर बसताना पाय खाली जमीवर सरळ ठेवून बसतात. असे लोक शिस्तप्रिय असतात आणि वेळ पाळतात.

  • जे लोक पायांना एकदम चिपकवून ठेवतात आणि खुर्चीवर थोडे तिरपे होऊन काम करतात असे लोक व्यवहारात थोडे जिद्दी मानले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com