Navratri 2023 : आई अंबाबाईची आज समुद्रमंथनानंतर प्रकट झालेल्या मोहिनी रूपातील सालंकृत पूजा

देवीच्या मोहिनी रूपामागील पौराणिक कथा काय आहे?
Navratri 2023
Navratri 2023esakal

Navratri 2023 :  नवरात्रीच्या सहाव्या माळेदिवशी करवीर निवासीनी श्री अंबाबाईची मोहिनी रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली आहे. देव आणि दानव यांच्यात झालेल्या युद्धानंतर श्री विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता. त्याच रूपात आज देवीची पूजा बांधण्यात आली.

देवीच्या मोहिनी रूपामागील पौराणिक कथा

कोण एकेकाळी महर्षी दुर्वासांनी दिलेल्या देवी निर्माल्याचा अपमान देवराज इंद्राकडून घडला. त्यामुळे तुझे सर्व वैभव क्षीरसागरात बुडून जाऊ दे असा शाप महर्षी दुर्वासांनी इंद्राला दिला. इंद्र अर्थातच देवांचा राजा त्यामुळे सर्व देवांचे सर्व वैभव अगदी भगवान विष्णूंच्या अर्धांगिनी लक्ष्मीसह सर्व संपदा म्हणजे ऐरावत कल्पवृक्ष असं सर्व काही क्षीरसमुद्रामध्ये लुप्त झाले.

Navratri 2023
Navratri 2023 : आदिमाया धनदाईदेवीच्या मानाच्या ध्वजासाठी पितळी ध्वजस्तंभ; कुलस्वामिनीस अर्पण

तेव्हा भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून देवराज इंद्राने असुरांच्या साहाय्याने समुद्रमंथन करायचे ठरवले. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून समुद्र घुसळण्याचे ठरले. परंतु अथांग समुद्रामध्ये मंदार पर्वत बुडू लागताच भगवान विष्णूंनी कुर्मावतार धारण करून तो पर्वत स्वतःच्या पाठीवर पेलून धरला.

सागर मंथन सुरू होताच सर्वप्रथम कालकूट विष निघाले ते भगवान शंकराने त्रिभुवनाच्या हितासाठी प्राशन केले. एक एक करून लक्ष्मी कौस्तुभ पारिजात वगैरे रत्न उदयाला आली. सगळ्यात शेवटी धन्वंतरीच्या हातामध्ये सुवर्णकलशात अमृत प्रगट झाले.

अमृत पिऊन अमरत्व मिळवण्यासाठी देवदैत्यांची जणू लढाईच सुरू झाली. त्यावेळेला भगवान नारायणांनी आदिशक्तीचे ध्यान करून तिच्या स्वरूपाशी सारूप्य मागितले तेव्हा साक्षात शृंगार नायिकेचे मोहिनी रूप घेऊन भगवान विष्णू देवदैत्यांमध्ये अमृत वाटायला उभे राहिले.

Navratri 2023
Navratri 2023 : सहावी माळ, रोग, दु:ख अन् भितीचा नायनाट करते माता कात्यायनी;अशी करा पूजा अन् उपासना   
देन अन् दानवांच्या मध्ये अमृत वाटणाऱ्या अंबामातेचे मोहिनी रूप
देन अन् दानवांच्या मध्ये अमृत वाटणाऱ्या अंबामातेचे मोहिनी रूपesakal

देवांच्या पंगतीमध्ये राहू नावाचा दैत्य देवाचे रूप घेऊन बसला होता हे सूर्य चंद्र यांनी मोहिनीला खुणावताच मोहिनीने सुदर्शन चक्र बोलवून राहूचे मस्तक तोडले पण राहूला अमृताचा स्पर्श झाल्याने त्याचे धड आणि मस्तक दोन बाजूला फिरू लागले.

त्यांनाच राहू आणि केतू म्हणून ओळखले जाते. मोहिनीच्या रूपावर भाळलेल्या दैत्यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी युद्ध करायला प्रारंभ केला. पण अमृतप्राशन करून तृप्त झालेले देव विजयी झाले. आणि इंद्राला पुन्हा स्वर्गाची संपदा प्राप्त झाली.

जगताला मोहिनी घालणाऱ्या या रूपावर भगवान शंकर ही भाळले. भगवान शंकरांनी मोहिनीकडे तिच्या प्रेमाची याचना करतात.

पुढे मार्तंड भैरव अवतारात तुमची पत्नी होईन असे तिने वचन दिले तीच भगवती म्हाळसा म्हणजे खंडेरायाची अर्धांगिनीचं होय. तिचे तेज पार्वतीचं आहे कारण मोहिनी ही दुसरी तिसरी कोणी नसून मुळात आदिशक्ती ललिताच आहे.

देवीच्या मागील बाजूस देव दानवांचा समूद्रमंथनाचा प्रसंग साकारण्यात आलाय
देवीच्या मागील बाजूस देव दानवांचा समूद्रमंथनाचा प्रसंग साकारण्यात आलायesakal
Navratri 2023
Navratri Vrat Recipe : उपवासात ट्राय करा वरईचे टेस्टी कटलेट, जाणून घ्या रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com