Navratri 2024 : नववी माळ कामात यश देऊन भक्तांचं भलं करणारी माता सिद्धिदात्री
Navratri 2024 :
नवरात्रीच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुर्गेच्या शेवटच्या रूपाची म्हणजे माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.ही माता दुर्गेची नववी शक्ती आहे. माता सिद्धिदात्री माणसाला यश देते. त्यांची योग्य रीतिरिवाजाने व पूर्ण भक्तीभावाने पूजा केल्यास त्या व्यक्तीला सर्व सिद्धी प्राप्त होतात.
यासोबतच व्यक्तीला ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळवण्याचे धैर्यही मिळते. माता सिद्धिदात्रीच्या कृपेनेच शिवशंकरांना सिद्धी प्राप्त झाल्याचं देवीपुराणात म्हटलं आहे. आईच्या कृपेमुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीचे होते. शिव शंकरांच्या या रूपाला अर्धनारीनटेश्वर म्हणतात. (Navratri 2024)
सिद्धिदात्री मातेची आराधना केल्याने भक्तांच्या सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात. आई तिच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते,अशी मान्यता आहे.
देवीची पूजा कशी करावी?
पाटावर कापड पाघरावे. त्यावर देवीची प्रतिमा आणि कलशाची स्थापना करावी. देवीच्या प्रतिमेला कुंकू वहावे. देवीच्या फोटोला फुले वहावीत. पूजा करून त्यामध्ये असलेल्या सर्व देवी-देवतांचे ध्यान करावे. यानंतर मातेच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी घरात कन्या पूजन आणि भोजन आयोजित करावे.
देवीला कोणता रंग आवडतो?
माता सिद्धीदात्री ही मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे. त्यामुले मातेला अगदी जांभळा आणि लाल रंग खूप आवडतो. कारण हे रंग शुभ मानले जातात.
देवीला कोणता नैवेद्य द्यावा?
नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. तिला सिद्धींची देवताही म्हणतात. नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

