New Year Beauty Tips: तुमचा स्किन टोन डार्क आहे? जाणून घ्या कोणता हायलायटर वापरावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

तुम्हाला नविन वर्षाची पार्टी करायची असेल तर मेकअप करताना हायलायटर कसे वापरावे याची माहिती जाणून घ्या.

New Year Beauty Tips: तुमचा स्किन टोन डार्क आहे?

काल ३१ डिंसेबरचं सेलीब्रेशन झालं आणि आज नविन वर्षाला (New Year 2022 Begins)सुरुवात झाली आहे.काही जणांची नविन वर्षाची पार्टी झाली असेल तर अजून काहींनी वर्षाचा (Happy New Year 2022)पहिला दिवस संस्मरणीय करायचा असेल. तुम्हाला आजच्या पार्टीत जर इतरांनपेक्षा वेगळ दिसायचं असेल तर, आज काही ब्यूटी (Beauty Tips)टिप्स सांगणार आहोत.

पार्टी घरी असो कि आॅफिसमध्ये (New Year Party in Home, Office) यावेळी ड्रेस कसा असावा, मेकअप (Makeup)कोणता करावा याची काळजी महिलांना खूप असते. तुमचा मेकअप जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा तो परीपूर्ण होण्यासाठी हायलायटर (Highlighter) गरजेचा असतो. हायलायटर वापरत असताना तो कसा वापरावा, कोणत्या स्किन टोनला कोणता वापरायचा याची माहिती नसल्याने खूपदा चुका होतात. ज्याचा परीणाम डायरेक्ट चेहऱ्यावर होतो. आणि आपण संुदर दिसण्या एेवजी खराब दिसू लागतो. यासाठी स्किनटोन नुसार हायलायटर वापरला पाहिजे. मुळात डार्क स्किन,मीडियम स्किन ,फेयर स्किन असे तीन प्रकारचे स्किन टोन (Skin Tone)असतात. यातील आपला कोणता शेड आहे हे ओळखूनच मेकअप साहित्य खरेदी करावे लागते. टोनमध्ये थोडा जरी फरक पडला तर पूर्ण मेकअप खराब होतो. पार्टीत आपण काहीतरी वेगळे दिसायला लागतो. यासाठी काही टिप्स आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया..

डार्क स्किन टोन (Dark Skin Tone)

तुम्हाला नविन वर्षाची पार्टी करायची असेल तर मेकअप करताना हायलायटर कसे वापरावे याची माहिती जाणून घ्या. जर तुमचा स्किन टोन डार्क असेल तर, तुम्ही वाॅर्मर शेड जसं की, गोल्डन, ब्राॅन्ज (Golden, Bronze) हायलायटर वापरा. तुमच्या स्किनला कॉम्पलिमेंन्ट करण्यास मदत करेल.याशिवाय पिच शेड ही लावू शकता. डार्क स्किनवर (Dark Skin Tone)सिल्वर शेड लावू नका.

मध्यम स्किन टोन (Medium Skin Tone)

तुमचा वर्ण गहू रंगाचा असेल तर, गोल्डन शेड हायलायटरचा वापर करा. ज्या महिलांचा स्किन टोन मीडियम आहे त्यांनी वार्म टोन हायलायटर वापरा.

टिप - डोळ्यांना ब्लू शेड वापरु नका

फेयर स्किन टोन (Fair Skin Tone)

तुमची स्किन गोरी असेल तर, सिल्वर शेड (Silver Shade) वापरा. फेयर स्किन उढून दिसते.

टिप- ब्रॉन्ज आणि कॉपर शेडचा वापर करु नका. हा शेड फेयर स्किन मेकअप लुक खराब करून टाकतो.

Disclaimer:यात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beauty TipsMakeup Tips
loading image
go to top