माय फॅशन : अनुकरण टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Niharika Roy

मला साधारणतः कंफर्टेबल आणि स्टायलिश दिसणारे कपडे घालायला आवडतात, मग ते जीन्स, शर्ट्‌स, शॉर्ट्‌स इत्यादी काहीही असू शकतात.

माय फॅशन : अनुकरण टाळा

- निहारिका रॉय

मला साधारणतः कंफर्टेबल आणि स्टायलिश दिसणारे कपडे घालायला आवडतात, मग ते जीन्स, शर्ट्‌स, शॉर्ट्‌स इत्यादी काहीही असू शकतात. फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घ्यावी लागते. मला वाटतं, कपडे घालताना आपण कंफर्टेबल असणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. कारण, तुम्ही कंफर्टेबल नसाल, तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. कोणाला ड्रेस घालणे कंफर्टेबल वाटत नसेल, तर ते जीन्स, टी-शर्ट, पलाझो किंवा सलवार कुर्ता घालू शकतात आणि त्याला साजेशी ज्वेलरी, कानातल्या रिंग्ज, बॅग्ज, हातातल्या ॲक्सेसरीज, साजेसे शूज यांचा वापर करून सहजपणे स्टाइल करू शकतात. मी साडी फारशी नेसत नाही, त्यामुळे मला त्याबद्दल फारसे ठाऊक नाही; पण ती नीट नेसायला हवी आणि साडीमध्येही मोकळे आणि कंफर्टेबल वाटावे यासाठी तिच्या निऱ्या नीट यायला हव्यात.

माझा फॅशन फंडा अगदी सोपा आहे....‘बी युअरसेल्फ’. आपण दुसऱ्यांचे अनुकरण नाही केले पाहिजे. मला वाटतं, की जेव्हा आपण जसे आहोत, तसेच राहिलो तरच आपण सुंदर दिसू शकतो आणि आपण जे काही परिधान केले आहे, त्यात कॉन्फिडंट वाटू शकतो. मला वाटतं, की आपण काय पोशाख परिधान करतो आणि ते कसे कॅरी करतो ते आपली व्याख्या करतं आणि ते आपल्या व्यक्तिमत्त्वाचा हिस्सा बनतं. काहीवेळा आपल्या पोशाखामधून आपला मूडही व्यक्त होतो.

मला सगळेच रंग आवडतात. ते आपल्या कपड्यांना आणि मूडलाही मूल्य प्रदान करतात. माझ्याकडे सगळ्याच रंगांचे कपडे आहेत; पण मी लाल, ब्राऊन आणि भगव्या रंगाचे कपडे घालणे टाळते. भडक आणि गडद रंगांपेक्षा मी हलक्या रंगाचे कपडे परिधान करते. अर्थात हे माझ्यासाठी आहे. इतरांनी सर्व रंग वापरून पाहावेत आणि आपल्या मूड, आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम निवड करावी.

सध्या मी ‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ या मालिकेत राधाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे मला कपड्यांबाबत जास्त काळजी घ्यावी लागते. माझी फॅशन आयकॉन अशी कोणी नाहीये; कारण मी जे काही कपडे घालते, त्यात कम्फर्टला प्राधान्य देते आणि मग ॲक्सेसरीजचा वापर करून त्या कपड्यांमध्ये स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करते. इतक्या वर्षांनंतर मला काय चांगलं दिसतं ते कळलं आहे आणि मी ते खास प्रकारची केशभूषा आणि मेकअप यांसह ते कॅरी करते. त्यामुळे माझी फॅशन आयकॉन मीच आहे.

फॅशन टिप्स...

  • आपण जे काही कपडे घालत असू, त्यांचा परिणाम साधण्यासाठी कमीत कमी ॲक्सेसरीजचा वापर करावा.

  • फूटवेअर नेहमीच नीट आणि स्वच्छ असायला हवे; कारण माझ्या मते त्यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. मी माझे फूटवेअर नेहमीच स्वच्छ ठेवते. मी जेव्हा कधी नवीन कोणाला भेटते, तेव्हा त्यांनी काय फूटवेअर घातले आहे याकडेच माझे पहिले लक्ष जाते.

  • सगळ्याच गोष्टी कमीत कमी ठेवाव्यात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. मग तो मेकअप असो, केशभूषा असो किंवा ज्वेलरी, ते आपले कपडे आणि जागा यांना साजेसे असायला हवे.

  • सर्व रंग वापरून पाहावेत आणि आपला मूड, आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम निवड करावी.

  • सगळ्यात शेवटचे म्हणजे आत्मविश्वास. आपण घातलेल्या कपड्यांबद्दल आपल्याला आत्मविश्वास असेल तर सर्वोत्तम दिसण्यासाठी आणखी कुठल्याही गोष्टीची गरज नाही.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

टॅग्स :Fashionlifestyleclothes