esakal | असा सुरू झाला 'No Shave November'!

बोलून बातमी शोधा

No Shave November}

"नो शेव्ह नोव्हेंबर' हा फक्त सोशल मीडियावर किंवा इतरत्र चालणारा टेंड्र नसून ते सोशल मीडिया कॅम्पेन आहे. यात महिन्याभर शेव्हिंग आणि ग्रुमिंगवर खर्च होणारे पैसे वाचवून गरजू रुग्णांसाठी मदत म्हणून देण्याचा या कॅम्पेनचा उद्देश आहे. 

असा सुरू झाला 'No Shave November'!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील सोशल मीडिया "नो शेव्ह नोव्हेंबर' या पोस्ट आणि हॅशटॅगनी भरलेला दिसत असल्याचा प्रत्यय या महिन्यात येत आहे. यावरून सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये दाढी वाढवून, तिच्यावर व इतर प्रसाधनांवर होणारा खर्च टाळून ते पैसे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वापरण्याचा उद्देश आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

असा सुरू झाला नो शेव्ह नोव्हेंबर!
या कॅम्पेनची सुरुवात अमेरिकेतील शिकागोमधल्या हिल परिवाराने केली. आपल्या वडिलांची म्हणजे मैथ्यू हिल यांचा कर्करोगाने दुदैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठ मुलांनी कॅम्पेनसाठी चॅरिटी गोळा करण्यास सुरवात केली. "नो शेव्ह नोव्हेंबर' हा फक्त सोशल मीडियावर किंवा इतरत्र चालणारा टेंड्र नसून ते सोशल मीडिया कॅम्पेन आहे. यात महिन्याभर शेव्हिंग आणि ग्रुमिंगवर खर्च होणारे पैसे वाचवून गरजू रुग्णांसाठी मदत म्हणून देण्याचा या कॅम्पेनचा उद्देश आहे. 

आपणही सहभाग होऊ शकतो 
या कॅम्पेनमध्ये आपणही सहभागी होऊ शकतो. फक्त संपूर्ण नोव्हेंबर आपल्याला रेझरचा वापर करता येत नाही. क्‍लीन शेव्ह करणारी लोक याला अपवाद आहेत; पण ट्रिमिंग करण्यापासून तुम्हाला मज्जाव नाही. 

बियर्ड ऑइल, वॅक्‍सचा वापर 
या कॅम्पेनसाठी दाढी राखण्यासाठी तरुणाई विविध बियर्ड ऑइल, वॅक्‍स इत्यादी प्रसाधनांचा वापर करत आहे. बिअरडो, दि मॅन कंपनी, उस्त्रा, लॉरिअल पॅरिस इत्यादी कंपनीचे ब्रॅण्ड सध्या मार्केटमध्ये चर्चेत आहेत. अवघ्या 200 ते 300 रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत ही प्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन दाढी राखण्याचीही हौस तरुणाई पुरवून घेत आहे. 

दाढीची फॅशन आणि सामाजिक जाणीव यांचा संगम या कॅम्पेनच्या माध्यमातून साधला जातोय. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारीही या कॅम्पेनमध्ये सहभागी आहेत. 
-शेखर पाटील, "नो शेव्ह नोव्हेंबर' कोल्हापूर कॅम्पेनचे प्रर्वते 

मी पहिल्यापासून दाढी ठेवत आलोय. त्यामुळे "नो शेव्ह नोव्हेंबर'चे मला तसे वेगळे अप्रूप नाही. पण विशेषतः या महिन्यात मी विविध बियर्ड ऑइल्सचा वापर करतो. 
अजिंक्‍य आडके, विद्यार्थी. 

या महिन्यात दुकानात फारशी गर्दी नव्हती. केस कापण्यासाठी लोक पार्लरमध्ये येत होती. "नो शेव्ह नोव्हेंबर'बद्दल मला कल्पना नसली, तरी तरुणाईच्या या विषयावर गप्पा सध्या हमखास ऐकायला मिळतात. 
- विलास महाबोले, व्यावसायिक