Numerology : मोबाईल नंबरचे आकडेच सांगतील माणसाचा खरा स्वभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Numerology

Numerology : मोबाईल नंबरचे आकडेच सांगतील माणसाचा खरा स्वभाव

माणसाचा स्वभाव हा सहसा राशींवर अवलंबून असतो. मात्र अंकशास्त्रानुसार आपण आकडेवारीतूनही माणसाचा स्वभाव जाणून घेऊ शकतो. माणसाजवळ सतत राहणारी गोष्ट म्हणजे मोबाईल. हाच मोबाईल माणसाचा खरा स्वभाव ओळखण्यास मदत करतो.

अंकशास्त्रनुसार मोबाईल नंबरच्या आकड्यांवरुन माणसाचा खरा स्वभाव ओळखता येतो. चला तर जाणून घ्या, कसं? (Numerology mobile number shows your real nature )

  • मोबाईल नंबरमध्ये एक आकडा असायलाच हवा. तो म्हणजे दोन. दोन हा अंक चंद्राचं प्रतिनिधित्व करतो.

  • 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये असलेल्याने नाते संबंध आणि बिझनेसमध्ये प्रगती होत असते.

  • जर तुमच्या मोबाइल नंबरमध्ये दोन हा नंबर एकदा येतो तेव्हा तुम्ही बुद्धिमान आणि संवेदनशील असल्याचं सुचित चिन्ह असतं.

  • जेव्हा 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो, तेव्हा ते व्यक्ती बुद्धिमान असल्याचं भासते. असे लोक कायम भविष्याचा विचार करत असतात.

  • ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये दोन हा अंक तीनदा येतो ते व्यक्ती कायम दु:खी राहतात. त्यांच्या मनाप्रमाणे काहीच होत नाही असं त्यांना नेहमी भासतं.

  • जेव्हा व्यक्तीच्या मोबाईलमध्ये दोन हा अंक चार किंवा चार पेक्षा जास्त असतात तेव्हा त्या व्यक्तीची सहनशीलता खूप कमी असते. त्यांना लगेच कोणत्याही गोष्टीवर राग येतो. सोबतच ते खूप भावनिक असतात ज्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता.

  • जेव्हा व्यक्तीच्या मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 2 येते, असा मोबाइल नंबर व्यक्ती खूप समजूतदार, आनंदी, आणि नेहमी सहकार्य करणारा असतो.

  • ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये दोन हा नंबर एकदाही नसतो ते व्यक्ती अत्यंत महत्त्वकांक्षी असतात. या व्यक्तींचा आयुष्यात स्वतःशीच खूप संघर्ष असतो. ते नेहमी आयुष्यात नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात.