

Sakal
ऑनलाइन गेमिंगमुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तासन्तास मोबाइलवर गेम खेळण्यामुळे मुलांमध्ये आक्रमकता, अनिद्रा, आणि डिप्रेशन वाढत आहे. पालकांनी मुलांच्या गेमिंगवर नियंत्रण ठेवून त्यांना मैदानी खेळ आणि सामाजिक उपक्रमांकडे वळवावे. डिजिटल शिस्त आणि संतुलन राखणे काळाची गरज आहे.
effects of online gaming on mental health: ‘थोडावेळ गेम खेळतो....’ म्हणणारे मूल आता तासन्तास मोबाइलसमोर असणारे चित्र सर्वदूर दिसत आहे. घरात नातेवाईक आले, तरी मुलांसह अनेकांचे डोळे स्क्रीनवरच असतात. पालकांचे ‘बस झाले आता ठेव मोबाइल’ हे वाक्य रोजच्याच आयुष्याचा भाग झाले. मोबाइलचे वेड हे प्रत्येक घरातील वास्तव बनले. मोबाइल हे आधुनिक युगातील ंस्आवश्यक साधन असले, तरी तोच आता ‘आयुष्याचा शत्रू’ ठरत आहे. मैदानावरील गर्दी रोडावली आहे. गल्लीबोळांत क्रिकेटमध्ये काही गुंतलेही असतील. मात्र, त्यापेक्षा घरकोंबडे बनून अनेक मुले तासनतास मोबाइलवर गेम खेळण्यात घालवितात. मुलांच्या हा हट्टापुढे पालकही हतबल झाल्याची कथा घरोघर झालेली ऐकण्यास मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक असला, तरी शिक्षण, संपर्कास मनोरंजनासाठीचा मोबाइल आता एक व्यसनच बनले आहे. दीडशेपेक्षा अधिक वेळा एक व्यक्ती दिवसभरात मोबाइल चेक करतो. एकल कुटुंब पद्धतीत मुलांना काहीसे खूश करण्यासाठी दिलेला मोबाइल आता मुलांच्या हातून सुटत नसल्याच्या तक्रारी मानसोपचारतज्ज्ञांकडे कायम यायला लागल्या आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.