esakal | ऑनलाइन शॉपिंगच्या व्यसनापासून मुक्त व्हायचंय? हे करा..
sakal

बोलून बातमी शोधा

online shopping

ऑनलाइन शॉपिंगच्या व्यसनापासून मुक्त व्हायचंय? हे करा..

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ऑनलाइन शॉपिंगचं वेड हा एक ‘आजार’ आहे, हे लक्षात घेतलं, तर उपचारांनी तो बरा होऊ शकतो. याविषयी सामाजिक जागृती करणं भारतासारख्या विकसनशील देशातही आवश्‍यक झाले आहे. अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. त्या पाळल्या, तर परिस्थिती हाताबाहेर जाणारच नाही. या काही गोष्टींची काळजी घ्या.

मुक्त होण्यासाठी काय कराल?

कधीही खरेदी करण्याआधी हव्या असलेल्या वस्तूंची यादी करा.

गरज नसताना खरेदी करू नका.

मासिक खर्चाचं आकलन करूनच यादी तयार करा.

चढाओढीत पडू नका किंवा प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या गरजांचा सारासार विचार करून मगच खरेदी करा.

शक्‍य झाल्यास ऑनलाइन शॉपिंगला उद्युक्त करणारी कमीत कमी ॲप्स मोबाईलमध्ये ठेवा. या छोट्याशा गोष्टीमुळं मनावर ताबा ठेवणं सोपं होईल.

दररोजचा स्क्रीन टाइम मर्यादित असला पाहिजे. साधारण एक तासाहून अधिक वेळ मोबाईलवर घालवू नका.

छंद जोपासा.

नियमीत मैदानी खेळ खेळा. व्यायाम करा.

सतत कार्यशील राहा. जेणेकरून वैफल्याची भावना किंवा ताणतणाव वाढणार नाही.

मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा.

वैद्यकीय उपचार

ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डरमध्ये वरचे प्रतिबंधात्मक उपाय करूनही काही फरक जाणवत नसेल, तर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घेणं आवश्‍यक असतं. या उपचारांत कॉग्निटीव्ह बिहेविअर थेरपी (बीटी) आणि नैराश्‍य घालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग होतो.

लठ्ठपणा, जंक फूड ॲडिक्‍शन

ऑनलाइन शॉपिंगप्रमाणंच ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या ॲप्सची गर्दी बघता नजीकच्या भविष्यकाळात बाहेरच्या खाण्यामुळं होणारे लठ्ठपणा, जंक फूड ॲडिक्‍शनसारख्या समस्या होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यावरही वेळीच उपाययोजना आणि उपचार करणं आवश्‍यक आहे.

स्व-मदत गट

सध्या अनेक स्व-मदत गटसुद्धा कार्यरत आहेत. अशा गटांमध्ये समान समस्या असणारे लोक कार्यरत असतात. ते एकमेकांना मदत करतात, अनुभवांची, उपचारांची देवाणघेवाण करतात आणि माहितीही देतात. ‘स्पेंडर्स ॲनॉनिमस’, ‘डेब्टर्स ॲनॉनिमस’ यांसारखे स्व-मदत गट शॉपिंगच्या नशेतून बाहेर यायला निश्‍चित मदत करू शकतील. स्वतःच्या अनुभवांनी इतरांना सावध करण्याचाही हा एक प्रयत्न आहे.

सुजाण नागरिक, पालक म्हणून काय करायचं?

इंटरनेटच्या अतिवापरामुळं होणाऱ्या ऑनलाइन शॉपिंग डिसॉर्डरपासून आपल्या प्रियजनांना किंवा पाल्यांना वाचवण्यासाठी आपण सर्व मिळून काही महत्त्वाची मदत करू शकतो.

loading image