
तुमच्या ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात वाढ झालीय? तर नक्की वाचा
कोरोना पार्श्वभूमीवर आता तर संचारबंदी लागल्यामुळे काही खरेदी करायची नसली तरी लोकं ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर जातात. अनेक लोकांना या दरम्यान ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलंय. हे असं व्यसन आहे ज्यानं लोकांचं मानसिक आरोग्यही बिघडलंय. असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घ्या तुम्ही तर या आजाराला बळी गेले नाही ना?सध्या कंप्युटर आणि मोबाईवरुन खरेदी सोपी झालीय. फक्त क्लिक करा आणि सामान तुमच्या घरी येतं. सध्या ऑनलाईन शॉपिंगचा बाजार वेगानं वाढतोय. पण याच वेगानं ऑनलाईन शॉपिंगचा आजारही वाढतोय
आर्थिक व मानसिक तणाव
वाढती ऑनलाईन शॉपिंग मानसिक आजाराचं स्वरुप घेऊ शकते. कारण लोकं ऑनलाईन शॉपिंग करताना आपलं उत्पन्न किती आहे, हे विसरुन जातात. शिवाय गरजेपेक्षा जास्त खरेदी करु लागतात. त्यामुळं माणूस आर्थिक संकटात सापडू शकतो आणि त्यामुळं मानसिक तणावही वाढू शकतो.
'बाईंग शॉपिंग डिसॉर्डर'
काही खरेदी करायची नसली तरी लोकं ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर टाईमपास करतात. अनेक लोकांमध्ये शॉपिंगच्या व्यसनाची लक्षणं आढळली आहेत. या सवयीला 'बाईंग शॉपिंग डिसॉर्डर' असं नाव देण्यात आलंय. या व्यसनामुळे लोकांच्या वागणुकीतही बदल होतो.
गरज नसताना ऑनलाईन शॉपिंग
लोकांना गरज नसताना ऑनलाईन शॉपिंग करावीशी वाटते आणि शॉपिंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकं कोणत्याही पातळीवर जायला तयार असतात. ज्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पडलेला दिसतो.
Web Title: Online Shopping Increased Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..