Open Pores Remedies | ओपन पोर्सने त्रस्त आहात? या उपायांनी मिळवा घरबसल्या सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Open Pores Remedies

Open Pores Remedies: ओपन पोर्सने त्रस्त आहात? या उपायांनी मिळवा घरबसल्या सुटका

मुंबई : प्रत्येकाला मुलायम आणि सुंदर त्वचा हवी असते. सध्याच्या प्रदूषण, धूळ, माती, ऊन यांच्या सततच्या भडीमारामुळे आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोर जाव लागत. त्यात त्वचेवर पोर्स होण ही सर्वात मोठी समस्या आहे. बऱ्याच वेळा हे पोर्स इतके जास्त वाढतात की त्वचा खडबडीत दिसू लागते. हे लपवण्यासाठी अनेक लोकं मेकअप करतात; पण याने त्वचेला अजून हानी पोहोचत असते.

हेही वाचा: Skin Care : मॉइश्चरायजेशन आणि हायड्रेशन म्हणजे काय ? तुमच्या त्वचेसाठी काय आहे आवश्यक ?

आजकाल ओपन पोर्सच प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसत. अनियमित झोप, खूप टेंशन, तेलकट पदार्थ असे अनेक कारणं यामागे असू शकतात. हे लपवण्यापेक्षा यांच्या वरती उपाय करणं जास्त गरजेच आहे. पण डरमिटोलोजिस्ट कडे जाण म्हणजे खूप पैसे खर्च होतात. पण या काही घरगुती उपायांनी तुम्ही हे पोर्स घालवू शकतात.

साखर

दोन चमचे पिठी साखरेत अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा

मध

एक चमचा मध घेऊन चेहऱ्याला मसाज करा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. मध त्वचेला हायड्रेट ठेवते.

हेही वाचा: Skin care : मानेवर खूप चामखीळ आले असतील तर हे उपाय करा...

वाफ घ्या

चेहऱ्यावरील पोर्स घालवण्यासाठी आठवड्यातून दोनदा वाफ घ्या. असे केल्याने चेहऱ्यावरची घाण निघायला मदत होते.

एलोवेरा जेल

अर्धा वाटी एलोवेरा जेलमध्ये १ चमचा दालचिनी पावडर आणि मध मिसळा. या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हातांनी ५ मिनिटे मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा.

ग्रीन टी

ग्रीन टी पावडरमध्ये एक अंडे, 2 चमचे बेसन आणि थोडे गुलाबजल घालून मिक्स करा. 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा धुवून चांगला पुसून घ्या.

अंडी

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि काही वेळ चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने ते थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

हळद

अर्धा चमचा हळदीमध्ये एक चमचा मध आणि खोबरेल तेल मिसळा. ते चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

टिप : वरील कोणताही उपाय करण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि उपाय करून झाल्यावर मोईश्चराईजर लावा.

Disclaimer: सदर लेख हा संपूर्णपणे सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही उपायांची पुष्टी करत नाही. हे उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.