Orange Tea Benefits : लवेंडर, ग्रीन टीच्या गर्दीत आता ऑरेंज टीची उडी, पिण्याआधी फायदे अन् रेसिपी जाणून घ्या

संत्र्याचा चहा बनवण्याची पद्धतही आहे वेगळी, पहा व्हिडिओ
Orange Tea Benefits
Orange Tea BenefitsEsakal

Orange Tea Benefits :

आजकाल सगळे लोक तब्बेतीच्या बाबतीत इतके जागरूक झाले आहेत, की प्रत्येकजण सल्ले, आरोग्य टीप्स देत असतो. लोकांच्या दिवसाची सूरूवात ज्या गोष्टीने होते तो कडक चहा. यातही अनेक व्हरायटी आल्या आहेत. लव्हेंडर, ग्रीन टीचे फायदे तुम्ही वाचले अन् अनुभवले असतील. तर आता ऑरेंज टीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

सध्या ऑरेंज चहाची रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ऑरेंज टी हा चवदार आणि आरोग्यदायी असतो आणि हिवाळ्यात प्यायला जातो. आज आम्ही तुम्हाला हा चहा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Orange Tea Benefits
Tea Benefits : चहाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! रोज तीन कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य; संशोधनात मोठी बाब समोर

काही लोक चहासाठी इतके वेडे आहेत. की त्यांना दुधाचा, मसालेदार चहाच प्यायचा असतो. आजवर केवळ ऑरेंज ज्यूसचे नाव ऐकलेल्यांसाठी हे थोडं विचित्र वाटतं असेल. पण आरोग्यासाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा ऑरेंज टी.

साहीत्य -

  • 1 संत्रा

  • 1 कप पाणी

  • 1 चमचे चहाची पाने

  • 2 चमचे साखर

Orange Tea Benefits
Green Tea Side Effects : चुकीच्या वेळी ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्याचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

असा चहा बनवा

  1. सर्वप्रथम संत्र्याची साल सुरीच्या साहाय्याने मधोमध कापून घ्या.

  2. आता एका भांड्यात पाणी ठेवा आणि त्यात सोललेली संत्री आणि साखर घालून उकळा.

  3. आता संत्र्याची साल धरा आणि त्यात सुई किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने छिद्र करा. जे चहाच्या गाळणीसारखे काम करेल.

  4. आता एक कप घ्या. त्यावर संत्र्याची गाळणी केलेली साल ठेवा.

  5. आता त्या सालीमध्ये २ चमचे चहापत्ती पाने टाका.

  6. आता उकडलेले संत्र्याचे पाणी सालीत टाका.

  7. तुम्हाला दिसेल की या सालीतून पाणी कपमध्ये जात आहे.

  8. सर्व चहा गाळून झाल्यावर तुम्ही तो पिऊ शकता.

  9. तुम्ही साखरेऐवजी मध घालूनही पिऊ शकता

  10. गरमागरम संत्र्याच्या चहाचा आनंद घ्या.

Orange Tea Benefits
Jaggery Tea : रोज गुळाचा चहा पिणे सुरक्षित आहे का? तज्ञ म्हणतात की...

या गोष्टीही लक्षात ठेवा

तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार चहाच्या पानांचा प्रकार आणि प्रमाण निवडू शकता. तुम्ही तुमच्या चवीनुसार संत्र्याचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. चहामध्ये दूधही घालू शकता.

Orange Tea Benefits
Green-Tea : ग्रीन-टी बद्दलचे गैरसमज

ऑरेंज टीचे फायदे

  • ऑरेंज टीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांचा चांगला समावेश असतो.

  • हा चहा सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतो.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर.

  • हा चहा वजन कमी करण्यासही मदत करतो.

Orange Tea Benefits
Tea Side Effects : दूधाचा चहा तुमच्या जीवावर उठलाय; वेळीच चहाचं व्यसन सोडा, वाचा काय म्हणतो रिसर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com