मन-निर्मळ : नको तिथे ‘शेअरिंग’

Psychology of Oversharing and Personal Boundaries : गोड बोलण्याच्या प्रभावाखाली खासगी माहिती शेअर करताना आपण स्वतःच्या निवडीकडे दुर्लक्ष करतो. माहिती सांगण्यामागील मानसिक गरजा, गॉसिपची सवय आणि वैयक्तिक जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे.
Psychology of Oversharing and Personal Boundaries

Psychology of Oversharing and Personal Boundaries

esakal

Updated on: 

डॉ. सुवर्णा बोबडे;समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

डॉक्टर, लोक माझा फार फायदा घेतात. गोड बोलून माझ्याकडून माहिती काढून घेतात आणि मग त्या माहितीचा हवा तसा वापर करतात. आता माझ्या चुलत नणंदेचंच बघा. किती गोड बोलत होती! आणि नंतर कळलं की तिने माझ्याच बोलण्याचा माझ्याविरुद्ध वापर केला. लोकांवर विश्‍वास तरी कसा ठेवायचा?’’

माझ्यासमोर बसलेल्या स्त्रीच्या बोलण्यात नाराजी आणि फसवणूक झाल्याची भावना होती. मी तिला विचारलं, ‘‘तुम्ही म्हणता की तिने तुमच्याकडून माहिती काढून घेतली. म्हणजे?...’’

‘‘ती इतकी गोड बोलते; मला वाटलंच नाही ती असं काही करेल.’’

मग मी विचारलं, ‘‘...आणि म्हणून?’’

‘‘मी सांगितली. तिने इतकं गोड बोलून विचारलं, की मी सांगत गेले.’’

Loading content, please wait...