पैठणी : ही फक्त सहावार साडी नाही; भारताच्या शतकानुशतकांच्या इतिहासाची कहाणी आहे.

शतकानुशतके आपल्या भारतीय महिलांना साडीची क्रेझ आहे आणि ही परंपरा प्रत्येक मुलीला आपल्या आईकडून पिढ्यानपिढ्या मिळाली आहे.
paithani
paithanigoogle

पैठणी साडी' ही फक्त सहा वार साडी नाही, तर भारताच्या शतकानुशतके जुन्या इतिहासाची कहाणी आहे. औरंगाबाद या शहरात बनवलेली पैठणी साडी आज जगभरात लोकप्रिय आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

शतकानुशतके आपल्या भारतीय महिलांना साडीची क्रेझ आहे आणि ही परंपरा प्रत्येक मुलीला आपल्या आईकडून पिढ्यानपिढ्या मिळाली आहे. जेव्हा साडीबद्दल बोलले जाते. तेव्हा तिचे विणकाम कसे आहे याला खूप महत्व दिले जाते.

या लोकप्रिय विणकामाचा आणि साडीचा १०० वर्षांहून अधिक इतिहास आहे. ही फक्त सहा वार साडीची गोष्ट नसून तर त्या साडीचा जरी काट, सौंदर्य आणि भव्यता यांची अद्भुत कहाणी आहे.पैठणी साड्यांचे उत्पादन महाराष्ट्रात औरंगाबाद जवळील पैठण नगरमध्ये होते. आज आम्ही तुम्हाला या सुंदर विणकराच्या कलेविषयी माहिती सांगणार आहोत.

२००० वर्षांचा इतिहास नेमका काय सांगतो?

पैठणी साडीचा उगम सातवाहन राजवटीत झाला जो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असावा असे मानले जाते. ही पैठणी साडी सुरुवातीला चीनमधून आणलेल्या उत्कृष्ट रेशमी धागे आणि शुद्ध जरी वापरून बनविली गेली होती, जी स्थानिक पातळीवर कातली होती. मात्र, एक वेळ अशी आली की ही साडी बनवण्यात ब्रेक लागला. पण १७ व्या शतकात पेशव्यांच्या कारकिर्दीत त्याचे पुनरुज्जीवन झाले आणि पैठणी साडीला पुन्हा मोठी लोकप्रियता मिळाली.

१७ व्या शतकाच्या शेवटी पेशव्यांनी पैठणी विणकरांना येवल्यात स्थायिक केले. जे सध्या या साडीचे मुख्य उत्पादन केंद्र आहे. सिल्क आणि सोन्याच्या धाग्याने विणलेली ही साडी एखाद्या राजवस्रांपेक्षा कमी नाही.

नंतरच्या काळात काय मोठा बदल झाला?

पारंपरिक पद्धतीने सोने आणि रेशीम घालून पैठणी साड्या तयार करायला किमान १८ ते २४ महिने लागत असे. त्यामुळे मग नंतरच्या काळात कॉटन बेसऐवजी, रेशीम बेस वापरल्यामुळे डिझाइनची गुंतागुंत ही सोपी झाली.

पारंपरिक जटिल पध्दतीने पैठणी तयार करायचा पॅटर्न हळूहळू बदलू लागला. आणि कमी वेळात पैठणी तयार होऊ लागली. पुढे मग पैठणी साड्यांच्या कलर पॅलेटमध्येही वेगवेगळे प्रयोग विणकरांनी करुन पाहिले.

या साडीचं महत्त्व काय आहे?

पैठणी साड्या हा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. साड्यांची राणी मानली जाणारी कांचीपुरम साडी जशी महिलांना प्रिय आहे, तशीच पैठणीही महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवते हे मात्र तितकचं खरं आहे.

पैठणी विणणे हे अत्यंत बारीक नक्षीकाम असते, त्यावर कोणताही धागा लटकत नाही. आताच्या पैठणी साड्यांना डिजाईनर समकालीन टच देण्याकरता पैठणी साडीवर वेगवेगळे प्रयोग करत आहे. पण पारंपरिक पैठणीत जी खरी मज्जा ती बाकी दुसऱ्या साड्यामध्ये नाही.

पारंपरिक पैठणीत कोणते रंग होते?

हळदीच्या मुळापासून मिळणारा गडद पिवळा आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांपासून मिळणारा फिकट पिवळा असे नैसर्गिक रंग पारंपरिक पैठणीत असायचे.

पैठणी साडीच्या डिजाईनचा साचा हा ठरलेला असतो. म्हणजे पैठणीच्या साडीच्या काठावर कोणती डिजाईन यावी, पदरावर कोणती डिजाइन यावी हे सगळं आधीच विणकराला सांगितलं जातं.

जर तुम्हाला नाविण्यपूर्ण पैठणी तयार करायची असेल तर तुम्ही विणकरांना तसं सांगू शकतात.

मग त्यावर विणकर आपली कल्पनाशक्ती वापरुन नवीन डिझाइन तयार करू शकतात किंवा विशिष्ट पारंपरिक नमुने वापरू तुम्हाला हवी तशी पैठणी तयार करुन देतात.

पण पैठणीची डिजाईन जरी बदलली तरी विणकाम करताना धाग्यांची संख्या नेहमी सारखीच राहते हे मात्र खरं आहे.

तुम्हाला जर पारंपरिक पैठणी विकत घ्यायची असेल तर तुम्ही औरंगाबादजवळच्या पैठण नगरीतून किंवा येवल्यातून ती घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com