ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.’‘साधं जेवता येत नाही तुला? चार नव्हे, पाच बोटांनी घास घे.’‘चालताना पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा, इतकीही अक्कल नाही तुला?’‘अरे असा काय चालतोस पोक काढून? जरा छाती पुढे काढून चाल.’.वरील वाक्यं कोणी कुणास म्हटली असतील?, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मुलांवर उपदेशांच्या सतत फैरी झाडणारे ‘लढाऊ पालक’ तुम्हीही पाहिले असतील. असा वारंवार उपदेश केल्याने मुले झटपट सुधारतात, ती शहाणी होतात, त्यांची प्रगती होते याबद्दल त्या लढाऊ पालकांची पक्की खात्रीपण असते.पण.. उपदेशांचा असा सतत गोळीबार केल्यानं मुलं सुधारण्याऐवजी जायबंदीच होतात. कारण, उपदेशांचा अतिरेक झाला की त्याबाबबतीत मुलं कोडगी होतात. त्यांना त्या ‘पालकांच्या मूल्यवान उपदेशाचं’ काहीच वाटेनासं होतं..काहीवेळा हे लढाऊ पालक मुलांच्या कानात उपदेशामृताचे घडे ओतत असतात. त्याचवेळी घरातील इतर मोठी माणसं सूचनांचे झेंडे फडकवत असतात आणि अशावेळी ते बिचारं मूल दुसराच काहीतरी विचार करत असतं. कारण त्या मुलासाठी हे आता रूटिनच झालेलं असतं.त्या उपदेशी मोठ्या माणसांपासून ते ‘प्रिय मूल’ खूप लांब गेलेलं असतं. ‘मोठ्या माणसांनी केलेली निरर्थक बडबड’ इतकीच किंमत मुलाच्या लेखी त्याला उरते. यामुळेच मुलाच्या वर्तनात टिकाऊ स्वरुपाचा अपेक्षित बदल होणे केवळ अशक्य होते..ही परिस्थिती बदलायची असेल तर एक सोपी युक्ती आहे. मुलांसाठी उपदेश हा त्रासदायकच असतो, हे एकदा समजून घ्या. कारण उपदेश करताना मोठ्या माणसांची भाषा ही चीड येणारी असते, मुलांचा अपमान करुन त्यांना टोचणारी असते आणि त्यांची देहबोली ही त्रासदायक, आक्रमक असते.म्हणून मुलांशी बोलताना त्यांना विश्वासात घेऊन बोलावं, त्यांना काय जमू शकतं याची त्यांना प्रेमाने जाणीव करुन द्यावी आणि मुख्य म्हणजे ‘मी तुझ्यासोबत आहे’ हा विश्वास त्याला आपल्या कृतीतून द्यावा. म्हणजे मग, मुलांच्या वर्तनात होणारा बदल हा त्यांच्या स्वेच्छेने होतो आणि म्हणूनच तो कायमस्वरूपी होतो..उदाहरणार्थ, ‘साधं जेवता येत नाही तुला? चार नव्हे- पाच बोटांनी घास घे’, असं आपण मुलाला सांगतो तेव्हा आपण मुलापेक्षा वेगळे आहोत, अधिक शहाणे आहोत आणि तू कसा बथ्थड आहेस असा संदेश मुलाला देत असतो. यामुळे मुलात परकेपणाची भावना तयार होते. ‘आपल्याला काहीच येत नाही’ असा न्यूनगंड मुलाच्या मनात तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणून त्याचे सतत दोष न दाखवता त्याला कसं जमू शकतं हे दाखवलं पाहिजे..अशावेळी, ‘हे बघ, मी कसा घास घेतो. ही पाच बोटं अशी जवळ घेऊन घास घेतला तर अंगावर सांडत नाही. थोडा सराव कर. सहज जमेल तुला. मलाही आधी जमत नव्हतं; पण नंतर जमलं.’ असं त्याला विश्वासात घेऊन प्रेमाने बोलणं पालकांकडून अपेक्षित आहे.‘पालक जेव्हा आपलं चुकणं मोकळेपणाने मुलांना सांगतात तेव्हा मुलांच्या चुका कमी होतात’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.