मुलं ड्रग्सच्या आहारी गेलीत कसं ओळखाल? 'ही' आहेत लक्षणे

तुमच्या मुलं व्यसनांच्या आहारी गेली नाहीयेत ना? ओळखा त्यांच्यातील बदल
drugs
drugs
Updated on

आपली मुलं वाईट मार्गाला जाऊ नयेत असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांवर पालक चांगले संस्कार करत असतात. मात्र, आई-वडिलांच्या संस्कारासोबतच मुलांवर समाजातील अन्य घटकांचाही परिणाम होत असतो. यामध्येच मुलांना वाईट मित्रांची संगत लागली की मुले गैरमार्गाला लागायला वेळ लागत नाही. म्हणूनच, पालकांनी मुलांच्या वागण्याबोलण्याकडे, त्यांच्या वर्तनाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. (parenting tips 12 signs that your kid is into drug abuse)

गेल्या काही काळात तरुण मुलं अंमली पदार्थ, इतर व्यसनांच्या आहारी जाण्याचं प्रमाण चांगलंच वाढल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, जर तुम्हाला सुद्धा मुलांमध्ये बदल झाल्याचं जाणवत असेल किंवा मुलं वाईट मार्गाला लागलीत असं संशय येत असेल तर त्यांच्यात झालेला बदल जाणून घ्या. यामध्येच मुले ड्रग्सच्या आहारी गेलेत हे कसं ओळखावं ते पाहुयात.

drugs
विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक!

'ही' आहेत मुलं ड्रग्सच्या आहारी गेल्याची लक्षणं

१. घरातून अचानक पैसे गायब होणे.

२. मुलांची वागण्याबोलण्याची पद्धत बदलणे.

३. मूड स्विंग होणे. लहान लहान कारणांवरुन चिडणे किंवा वाद घालणे.

४. काही वेळा मुलं प्रचंड शांत होणे किंवा एकलकोंडे झाल्यासारखं वाटणे.

५.मुलांच्या बेडरुममध्ये रुम फ्रेशनर्स, स्ट्रॉंग्स, सेंटेड कॅण्डल्सचा वापर वाढणे.

६. सतत माऊशवॉश करणे किंवा च्युइंगम्स, पेपरमिंट खाणे

७.डोळे सतत लाल असणे. अनेकदा डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी मुलं आयड्रॉपचा वापरही करतात.

८. झोपेचं प्रमाण वाढणे.

९. फर्स्टएड बॉक्समधील काही गोळ्या अचानक गायब होणे.

१०. अभ्यासावर परिणाम होणे.

११. जर मुलांच्या रुममध्ये कम्प्युटर डस्टर, नेल पॉलिश, नेल पॉलिश रिमुव्हर, रिगरेट लाइटर, व्हाइट आऊट, हेअरस्प्रे यासारख्या वस्तूंचा वापर जास्त वाढला असेल तर समजून जा मुलं व्यसनांच्या आहारी गेलेत.

१२. जुन्या मित्रांसोबतची मैत्री कमी होणे. तसंच नव्या मित्रांसोबतचा सहवास वाढणे. इतकंच नाही तर नव्या मित्रांसोबत कुटुंबियांची ओळख करुन देण्यास टाळाटाळ करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com