

Happy parents positive conversations with their child to nurture emotional security, confidence, and healthy personality development.
esakal
पालकत्व ही केवळ मुलांना वाढवण्याची प्रक्रिया नसून ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याची एक कला आहे. मुले आपल्या सभोवतालच्या वातावरणातून आणि विशेषतः पालकांच्या संवादातून जगाचा अर्थ लावत असतात. अनेकदा आपण मोठ्यांच्या ओघात किंवा रागाच्या भरात अशा काही गोष्टींची चर्चा मुलांसमोर करतो ज्याचा त्यांच्या कोमल मनावर खोलवर ओरखडा उमटतो. पालकांचे शब्द मुलांसाठी अंतिम सत्य असतात..त्यामुळे जर या चर्चेत नकारात्मकता असेल तर मुलांचा जगावरचा आणि स्वतःवरचा विश्वास उडू शकतो. मुलांशी असलेले नाते घट्ट ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास रुजवण्यासाठी पालकांनी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.