Parenting Tips:
Parenting Tips: Sakal

Parenting Tips: उन्हाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची घ्या खास काळजी, येणार नाहीत घामोळ्या

Parenting Tips: उन्हाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्वचेवर घामोळ्या येऊ शकतात.
Published on

Parenting Tips children skin care tips avoid red rashes and pimples

लहान मुलाच्या त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे, अन्यथा त्यांना पुरळ आणि घामोळ्यांचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की मुलांची त्वचा कोरडी पडू लागते. उन्हाळ्यात मुले बाहेर जातात तेव्हा त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही. यामुळे उन्हाळ्यात पालकांनी मुलांच्या त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे असते. लहान मुलांच्या त्वचेची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • पुरेसे पाणी

उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर पिंपल्स, घामोळ्या यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे लहान मुलांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी. यामुळे मुलांची त्वचा निरोगी राहील. तसेच मुलांच्या त्वचेवर सुज किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • सनस्क्रीन लावावे

जेव्हा लहान मुलं उन्हाळ्यात बाहेर जातात तेव्हा टोपी किंवा स्कार्फच्या मदतीने झाकून घ्यावे. दुपारच्या वेळी मुलांना बाहेर पाठवू नका. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जास्त असतात. महत्वाचे काम नसल्या उन्हात बाहेर जावू नका. तुमचे मुलं १२ वर्षापेक्षा मोठे असेल तर सनस्क्रीन लावावे.

Parenting Tips:
Summer Skin Care: घाम, उन्हाच्या चटक्याचा त्वचेवर परिणाम, अशी घ्या खास काळजी
  • थंड पाण्याने आंघोळ

उन्हाळ्यात साबण किंवा फेसवॉश वापरताना मुलांच्या त्वचेचा प्रकार ओळखावा. उन्हाळ्यात आंघोळ झाल्यावर त्याच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. जर मुलांना जास्त घाम येत असेल तर थंड पाण्याने आंघोळ घालावी.

  • कपड्यांची काळजी

उन्हाळ्यात लहान मुलांसोबत फिरायला जाणार असाल तर त्यांना सुती आणि सैल कपडे घालावे. यामुळे जास्त घाम येणार नाही.

  • आहाराची काळजी

उन्हाळ्यात लहान मुलांच्या आहारात सकारात्मक बदल करावा. त्यांना रसाळ फळ खायला द्यावीत किंवा फळांचा रस प्यायला द्यावा. आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com