मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी टाळा 'या' गोष्टी

पालकांच्या 'या' चुकीमुळे होऊ शकतो मुलांचा आत्मविश्वास कमी
marathi article blog father son relationship latter saurabh suryavanshi
marathi article blog father son relationship latter saurabh suryavanshi
Updated on

पॅरेंटिंग (Parenting) म्हणजे नेमकं? काय असा प्रश्न अनेकदा काही जणांना पडतो. काहींच्या मते, पॅरेंटिंग म्हणजे फक्त मुलांना जन्म देऊन, त्यांचं पालनपोषण करणं. परंतु, केवळ इतक्यावरच पालकांचं कर्तव्य संपत नाही. तर मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास करणं, त्यांना समाजातील जबाबदार नागरिक बनवणं हेदेखील पालकांचा कर्तव्य आहे. त्यामुळे मुलं लहान असतानाच त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, त्यांना शिस्त लावणे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा आत्मविश्वास वाढवणे ही पालकांची खरी जबाबदारी आहे. मात्र, अनेकदा लहान मुलांमधील आत्मविश्वास (Confidence) कमी असल्याचं पाहायला मिळतं. चारचौघात मुलं गेल्यावर ते बोलताना लाजतात किंवा घाबरतात. त्यामुळे मुलांच्या या समस्येवर पालकांनीच तोडगा काढला पाहिजे. म्हणूनच, मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या टाळाव्यात ते पाहुयात. (parenting-tips-due-to-these-five-habits-of-parents-childrens-confidence-level-is-down-ssj93)

१.मुलांची खिल्ली उडवणं टाळा-

मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत असताना पालकांचा पाठिंबा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांनी कोणतीही नवीन गोष्ट केली किंवा त्यांनी एखादा नवा प्रयोग केला तर पालकांनी मुलांचं कौतुक केलं पाहिजे. तसंच असेच नवनवीन प्रकार मुलांनी करावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु, अनेकदा मुलांनी कोणताही नवा प्रयोग केला की प्रथम पालकच मुलांची खिल्ली उडवतात. ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. मुलांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. तसंच आपण कायमच काही तरी चुकीचं करतोय असा त्यांचा समज होतो.

२. मुलांची तुलना करु नका -

अनेकदा पालकच आपल्या मुलांची इतर मुलांसोबत तुलना करत असतात. खासकरुन शाळेतील मार्क्स किंवा इतर अॅक्टीव्हिटीमध्ये ही तुलना आवर्जुन होत असल्याचं पाहायला मिळतं. पालकांच्या या वर्तनामुळे मुलांमधील नकारात्मकता वाढीस लागते. त्यातूनच मग मुले चिडचिड करु लगातात.

३. सतत चुका शोधू नका-

लहान मुलं अनेक चुकांमधूनच शिकत असतं. त्यामुळे त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर त्यांना ओरडण्याऐवजी नीट समजावून सांगा. तसंच अनेक पालकांना मुलांच्या लहान लहान चुका काढण्याची सवय असते. ही सवय टाळा.

४. पाहुण्यांसमोर मुलांची तक्रार करु नका -

अनेक पालक पाहुण्यांसोबत गप्पा मारत असताना मुलांची तक्रार करतात. मुलं किती मस्ती करतात, कसं ऐकत नाहीत हे सारखं सांगतात. त्यामुळे या सगळ्या प्रकारचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असतो. अनेकदा मुलं यातून डिप्रेशनमध्ये जातात.

५. मारु नका -

लहान मुलांनी हट्ट केल्यावर अनेक पालक त्यांना मारतात किंवा ओरडतात. परंतु, मुलांना मारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजवा. अमूक गोष्ट केल्यामुळे काय होईल किंवा ती गोष्ट आता गरजेची आहे का हे नीट त्यांना पटवून सांगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com