esakal | Parenting Tips: मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर

मुलांच्या मनावरचा ताण शोधा! 13 प्रश्नांमधूनच मिळू शकते उत्तर

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

हल्ली अजित घरी बोलतच नाही, अनलॉक झाल्यानंतही मित्रांसोबत बाहेर जात नाही, या अजितचं काय सुरुय काहीच कळत नाही. काय करू या मुलाचं....१६ वर्षांच्या अजितच्या आईला पडलेला हा प्रश्न. तर दुसरीकडे १२ वर्षांच्या शलाकाच्या आईचाही असाच अनुभव. शलाका घरी चिडचिड करतेय, काही विचारलं तर रागावते.. मनाविरुद्ध काही घडलं की डोळ्यात पाणी येतं, असं शलाकाच्या आईचे म्हणणे.

हेही वाचा: चेतना तरंग : मनावरील प्रभाव लक्षात घ्या...

कोरोना काळात प्रत्येकाच्या मनावरील ताण वाढत आहे. लहान मुलंही याला अपवाद नाही. वरील दोन घटना मुलांमधील ताण दर्शवणाऱ्या आहेत. सतत ताणात राहिल्याने चिडचिड करणे, रागावणे, कुटुंबीयांशी/मित्रांशी संवाद टाळणे असे प्रकार घडतात. अशा प्रसंगी पालकांचा मुलांसोबतचा संवाद महत्त्वाचा आहे. पालकांनी मुलांना पुढील प्रश्न विचारल्यास ताण शोधून काढण्यात नक्कीच मदत होईल.

हेही वाचा: लहान मुलांवरही येतो मानसिक ताण; आहेत 'ही' लक्षणं

- तुला आनंदी वाटत नाही का?

- जवळपासच्या कोणाचा त्रास होतोय का?

- तुझ्या हातून काही चूक झालीये का?

- अभ्यास करावासा वाटत नाही का?

- मित्रमैत्रिणीशी भांडण झाले का?

- मित्रमंडळींपैकी कोणी दबाव टाकतंय का?

- कोणी हिणवतंय का?

- घरच्यांपासून काही लपवत आहे का?

- अभ्यासात एखादा विषय आवडत नाही का?

- ऑनलाईन वर्गात शिक्षकांचं शिकवणं लक्षात येत नाहीये का?

- अभ्यासाची पद्धत चुकतेय का?

- एखाद्या विषयात सातत्याने कमी गुण मिळतात का?

- सोशल मीडियावर कोणी त्रास देतोय का?

हेही वाचा: मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, टॅबमुळे डोळ्यांवरील ताण वाढला; हे आहेत उपाय

असे प्रश्न न रागावता शांतपणे विचारल्यास मुलांशी संवाद वाढेल आणि मुलांच्या ताणाचं कारण लक्षात येईल. खरं कारण लक्षात आल्यावरच त्यावर मात करणे शक्य आहे. अन्यथा फार काळ ताणात राहणं हे चांगले लक्षण नाही.

(संदर्भ: पुस्तक – मेंदूचा पासवर्ड, सकाळ प्रकाशन, लेखिका- डॉ. श्रुती पानसे)

loading image
go to top