Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

मुलांना लग्नासाठी फोर्स करण्यापेक्षा त्यांच्या नकाराचं कारण जाणून घ्या
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips :

पूर्वीच्या काळी कुटुंबाच्या इच्छेनुसार लोक लग्नाच्या बंधनात बांधले जायचे. एक काळ असा होता की आई-वडिलांना मुलगा-मुलगी आवडल्याने एकमेकांना न पाहता लग्न लावले जायचे. पूर्वीच्या पालकांप्रमाणेच आजच्या पालकांनाही त्यांची मुले मोठी झाल्यावर लग्नाची काळजी करू लागतात. पण, मुलांना एकाच बोलण्यात लग्नासाठी तयार करणे खूप अवघड असते.

आपल्या मुलांनी वेळेवर लग्न करून सेटल व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटते. पण, लग्नाच्या नावानेच मुलांची चिडचिड होऊ लागते.मुलं तो विषय टाळू लागतात. पालक तोच तोच मुद्दा गिरवतात. त्यामुळे पालक चिडचिड करतात आणि मुलांचीही घुसमट होऊ लागते.

लग्नाबाबत मुलांकडून सतत नकार येणे हे पालकांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. पण पालकांनी न चिडता शांतपणे काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण, मुलं नकार देतात यामागे काय कारण असू शकतं, त्यांच्या मनात दुसरं कोणी आहे का याचाही विचार करायला हवाय.

Parenting Tips
Married life Tips : सेक्स वेदनदायी ठरतंय? असं निवडा योग्य ल्युब्रिकंट

मुलांना असते स्वातंत्र्य गमावण्याची भिती

आजची तरुण पिढी कॉलेज संपल्यानंतर आपलं स्वातंत्र्य गमावण्याच्या भीतीने घराबाहेर पडते. जिथे त्यांना मुक्तपणे जगण्याची संधी मिळते आणि त्यांची जीवनशैलीही बदलू लागते. अशा परिस्थितीत लग्नाच्या चर्चेमुळे स्वातंत्र्य गमावण्याची भीती त्यांना वाटत असते. म्हणूनही ते लग्नाला नकार देऊ शकतात.

बंधनं नकोशी वाटतात

लग्न म्हणजे बंधनं आहे. लग्नाच्या बेडीत अडकलो की एका सरळ रेषेत चालावे लागेल, मित्र, रात्री बाहेर फिरणे यावर बंधनं येतात असे वाटायला लागते. तसे तुमची मुलं विचार करू शकतात. त्यामुळे ते लग्न टाळू शकतात.

Parenting Tips
Married Life : सर्व बायकांना नवऱ्याकडून हेच ऐकायला फार आवडतं!

एखादे जूने नाते आणि वाईट अनुभव

आजकालची पिढी सगळ्याच गोष्टी खूप सोप्प्या पद्धतीने हाताळते. एखाद्यासोबत असलेले प्रेमप्रकरण पटकन विसरून पुढे जात असते. पण हे प्रत्येकालाच जमत नाही. ७-८ वर्ष रिलेशनमध्ये असलेली तरूण मुलं दुसऱ्या नात्यात अडकायला टाळाटाळ करतात. कारण त्यांना त्या नात्यात काहीतरी वाईट अनुभव आलेला असतो.

याउलट जर मुलं एखाद्याला विसरू शकत नसतील तरीही नव्या जोडीदाराला स्विकारणं जड जातं. त्यामुळेही लग्न नकोसे वाटते.

मित्र, कुटुंबातील अनुभव

एखाद्या मित्राचं लग्न होऊन ते सहाच महिन्यात तुटलं असेल. तर, आपण लग्न करून काय करायचं. जर ते लगेचच तुटणार असेल. असाही मुलं विचार करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा किंवा मोठ्या भावाचे लग्न मोडले असेल तर मुलं लग्नाला नकार देऊ शकतात.

Parenting Tips
Ali Sethi Marries Salman Toor : 'पसूरी' फेम गायक अलीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न!

खराब वैवाहीक जीवन

असे देखील होऊ शकते की, ज्या मुलांचे मित्र लग्न झाले आहेत. किंवा भावाचे लग्न वाईट काळातून जात असेल. तर, आपणही लग्न करून काही फायदा नाही असे वाटू लागते.म्हणूनही मुलं लग्नाला नाही म्हणू शकतात.

Parenting Tips
Kangana Ranaut Getting Married: कंगना करतेय लग्न? कार्ड वाटून पॅप्सला दिल निमंत्रण..पण नवरदेव कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com