लहान मुलांना नेलपॉलिश लावताय? जाणून घ्या, असे करणे किती सुरक्षित

लहान मुलांसाठी नेलपॉलिश लावणे कितपत सुरक्षित आहे आणि ते करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याची काळजी घेतली पाहिजे.
nails
nailsesakal
Summary

लहान मुलांसाठी नेलपॉलिश लावणे कितपत सुरक्षित आहे आणि ते करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याची काळजी घेतली पाहिजे.

अनेकदा तुम्ही घरातील लहान मुलं आरशासमोर उभं राहून तयार होताना पाहिली असतील, कधी ओठांवर लिपस्टिक लावली तर कधी हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावली असेल. हे करणारी मुलं घरातील मोठ्यांसाठी मनोरंजनाचा विषय ठरू शकतात. पण तुम्हाला माहीतेय का, खेळांमध्ये केलेले हे काम त्यांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. लहान मुलांसाठी नेलपॉलिश लावणे कितपत सुरक्षित आहे आणि ते करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याची काळजी घेतली पाहिजे.

nails
पुरूषांसाठीपण साडी फॅशन झाली आहे... तरूणाने शेअर केला व्हिडिओ

नेलपॉलिश लावणे सुरक्षित आहे का?

नेल पॉलिश तयार करताना केमिकल वापरली जातात. ज्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तविक लहान मुलांना तोंडात हात घालण्याची आणि नखे चावण्याची सवय असते. अशा परिस्थितीत नेलपेंटमध्ये असलेले केमिकल मुलांच्या तोंडातून पोटात पोहोचू शकते, ज्यामुळे नंतर अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी नेलपॉलिश निवडताना नेहमी केमिकल आणि टॉक्सिन फ्री नेल पेंट्स निवडा.

नेल पेंट मुलांच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवतात

नेलपॉलिशमध्ये असलेली अनेक हानिकारक रसायने मुलांच्या शरीरात जाऊन त्यांना हानी पोहोचवू शकतात.

टोल्युएन

नेलपॉलिश लवकर सुकवण्यासाठी हे केमिकल सर्वात जास्त वापरले जाते. NCBI वर उपलब्ध संशोधनानुसार, यामुळे न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात.

nails
आरसा चकचकीत करायचयं? ट्राय करा Easy ट्रिक्स

फॉर्मल्डिहाइड

या केमिकलच्या संपर्कात आल्याने मायलॉइड ल्युकेमिया होण्याचा धोका वाढू शकतो, हा कर्करोग जो अस्थिमज्जा, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्समध्ये असामान्यपणे विकसित होतो.

हायड्रोक्विनोन

हे केमिकल डोळ्याच्या संपर्कात आल्यावर कॉर्नियाचे नुकसान करू शकते, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर श्वास घेतल्याने नाक, घसा आणि वरच्या श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकते.

अ‍ॅक्रिलेट्स

नेलपॉलिश तयार करण्यासाठी अ‍ॅक्रिलेट्स केमिकलचाही वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम इनहेलेशन आणि त्वचेच्या संपर्कात दिसू शकतात. मिथाइल मेथाक्रिलेटच्या संपर्कात असलेल्या लोकांना आतडे, पोटाचा त्रास जास्त असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com