पीसीओएस आणि महिलांचे आरोग्य

माझ्या योगा क्लासमध्ये पीसीओएसचा (Polycystic Ovary Syndrome) त्रास असलेल्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे.
Yoga
Yogasakal
Updated on

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

माझ्या योगा क्लासमध्ये पीसीओएसचा (Polycystic Ovary Syndrome) त्रास असलेल्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. आजकाल अनेक तरुण मुली आणि महिलांना पीसीओएसचा विकार जाणवतोच आहे. हार्मोन असंतुलनामुळे होणारा हा आजार योग्य आहार, जीवनशैली आणि योगासनांद्वारे नियंत्रणात ठेवता येतो. महिलांनी या आजाराबद्दल जागरूक राहून त्यावर काम करणे गरजेचे आहे.

पीसीओएस म्हणजे काय?

पीसीओएस हा हार्मोनल विकार आहे, ज्यामध्ये महिलांच्या अंडाशयांमध्ये लहान लहान गाठी (सिस्ट) तयार होतात. यामुळे अंडाशयं योग्य प्रकारे कार्य करत नाहीत आणि मासिक पाळीत अनियमितता येते.

पीसीओएससाठी योगासनं

उष्ट्रासन (Camel Pose) : गुडघ्यावर उभे राहा. शरीर मागे वाकवत, दोन्ही हातांनी टाचा पकडा. मान मागे नेऊन ३० सेकंद राहा. फायदा : अंडाशय आणि पेल्विक क्षेत्रावर ताण येतो. हार्मोनल इम्बॅलन्स सुधारतो. पाठ, पोट आणि पेल्विक स्नायू मजबूत होतात.

शशांकासन (Child’s Pose) : गुडघ्यावर बसा, शरीर पुढे झुकवा आणि हात ताठ ठेवत कपाळ जमिनीला टेकवा. फायदा : पेल्विक क्षेत्रात तणाव कमी होतो, हार्मोनल इम्बॅलन्स दूर होतो आणि मेंदू शांत राहतो.

सुप्त बद्धकोनासन (Reclining Butterfly Pose) : पाठीवर झोपा, पायांच्या तळव्यांना एकत्र आणा आणि गुडघे बाजूला पसरवा. हात बाजूला ठेवा आणि डोळे मिटा. फायदा : ओटीपोटातील रक्ताभिसरण वाढतो, मासिक पाळी नियमित होते आणि तणाव कमी होतो.

उर्ध्वप्रसारित एकपादासन (Legs Up The Wall Pose) : भिंतीजवळ झोपा आणि दोन्ही पाय सरळ भिंतीवर टेकवा. हात सैल ठेवा आणि डोळे मिटा.

फायदा : पेल्विक रक्ताभिसरण सुधारतो, पचनक्रिया सुधारते आणि इन्शुलिन प्रतिकारशक्ती कमी होते.

मार्जारासन : टेबल पोझिशन घ्या, श्वास घेत पाठीला वाकवा (Cow Pose) आणि श्वास सोडत पाठ गोलसर करा (Cat Pose). फायदा : हार्मोन बॅलन्ससाठी उपयुक्त, ओटीपोटातील स्नायू आणि पेल्विक भाग सक्रिय होतो.

उत्कटासन (Chair Pose) : दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा ,जणू तुम्ही खुर्चीत बसत आहात, आणि दोन्ही हात वर करा.

फायदा : पोटाच्या खालील भागातील स्नायू सक्रिय होतात, चरबी कमी होते आणि मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

शवासन : पाठीवर झोपा, डोळे मिटा आणि पूर्ण शरीर सैल सोडा.

फायदा : मानसिक तणाव कमी करतो आणि हार्मोनल संतुलन राखतो.

प्राणायाम

कपालभाती : इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करण्यासाठी उपयुक्त.

अनुलोम-विलोम : मानसिक शांतता आणि हार्मोन बॅलन्स राखण्यासाठी आवश्यक.

पीसीओएस हा आजार असला, तरी तो तुमच्या जीवनशैलीचा भाग बनू नये. योग्य आहार, नियमित योगाभ्यास आणि मन:शांतीसाठी ध्यान यांचा समतोल साधला, तर तुम्ही यावर सहज मात करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com