Heat Wave: कडक उन्हामुळे बेशुद्ध होण्याचं प्रमाण वाढलं; उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

Heat Wave: अनेक लोकांना उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे अनेक लोक बेशुद्ध देखील होतात. यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
Heat Wave:
Heat Wave:Sakal

People are getting faint due heat wave take care health drink water juice

उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करणे खुप अवघड असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोक बेशुद्ध होतात. जास्त वेळ उन्हात राहणे, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे आणि बीपी कमी होणे अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे उन्हाळ्यात लोक बेशुद्ध होत आहेत. कडक उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊया.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावे?

पाणी प्यावे

उन्हाळ्यात ७ ते ८ ग्लास पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हायड्रेट राहावे

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवावे. तुमच्या आहारात पाणी, नारळपाणी आणि फळांचा रस यांचा समावेश करावा.

चहा-कॉफी

उन्हाळ्यात उष्माघातापासून दूर राहण्यासाठी चहा-कॉफीचे अति सेवन टाळावे.

डोळे आणि त्वचेची काळजी

उन्हात बाहेर जाताना डोळ्यांना चष्मा आणि चेहरा स्कार्फने बांधावा.

Heat Wave:
Healthy Drink For Stomach: 'या' गोष्टी पोटासाठी आहेत पंचामृत, उन्हाळ्यात पचनसंस्था राहील निरोगी

उन्हात फिरणे टाळावे

दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान बाहेर जाण्यास टाळावे.

लिंबूपाणी

उन्हातून घरी आल्यावर लिंबूपाणी किंवा पाणी पोटभर प्यावे. यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.

पोटभर नाश्ता

उन्हाळ्यात सकाळी पौष्टिक पदार्थांचा नाश्ता करावा. काही खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडू नका.

रसाळ फळ

उन्हाळ्यात संत्री, टरबुज, खरबुज यासारख्या रसाळ फळांचा समावेश करावा.

ताक

उन्हाळ्यात थंडगार ताक किंवा पन्ह प्यावे. यामुळे शरीराला उष्णतेपासून थंडावा मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com