Relation Tips | या लोकांपासून राहा सावध ! नाहीतर जुळून आलेलं नातं 'व्हॅलेंटाइन्स डे'ला होईल उद्ध्वस्त people who are dangerous for your relationship valentines day special how to protect Relationship | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relation Tips : या लोकांपासून राहा सावध ! नाहीतर जुळून आलेलं नातं 'व्हॅलेंटाइन्स डे'ला होईल उद्ध्वस्त

मुंबई : 'प्रेम आणि युद्धात सर्व न्याय्य आहे' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. लोक त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार कृतीचे समर्थन करण्यासाठी केव्हाही आणि कोठेही त्याचा वापर करत असतात.

एखाद्याच्या जोडीदाराला त्याच्यापासून दूर करणे यात काय बरे योग्य असू शकते ?

जे खरोखर प्रेम करतात ते आपल्या नात्यामध्ये कोणालाही येऊ देत नाहीत. पण फक्त यावर अवलंबून राहून तुम्ही तुमच्या जोडीदारावर आंधळा विश्वास ठेवू शकत नाही.

काही लोक असतात जे इतरांना त्यांच्या जोडीदारापासून दूर नेतात. आता अशा लोकांपासून तुमचं नातं कसं वाचवाल ? आधी ते लोक कोण आहेत हे जाणून घेऊ. (valentines day)

जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमधील एका अभ्यासानुसार, आधीपासून प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीच्या मनात मत्सर आणि द्वेष असतो.

यासाठी संशोधकांनी 187 जोडप्यांवर काम केले. त्याच्या निष्कर्षात अशी 2 व्यक्तिमत्त्वे समोर आली आहेत जी दुसऱ्याचा जोडीदार मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

अभ्यासात असे दिसून आले आहे की जे पुरुष आपल्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल प्रामाणिक नाहीत आणि ज्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांचा अभाव आहे आणि फसवणूक करण्याची प्रवृत्ती आहे, ते इतरांच्या जोडीदारावर प्रेम करण्यापूर्वी विचार करत नाहीत.

ज्या स्त्रिया दुसऱ्याच्या प्रियकर किंवा पतीसोबत रिलेशनशिपमध्ये असतात त्या सामान्यतः मनोरुग्ण असतात.

अभ्यासानुसार, ज्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराशी जास्त मतभेद आहेत किंवा ज्यांचा जोडीदार जास्त तापट स्वभाव, नैराश्य, चिंता याने त्रस्त आहे, त्या दुसऱ्याच्या जोडीदाराकडे जास्त आकर्षित होतात.

अशा लोकांशी तुमच्या जोडीदाराची ओळख करून देणे टाळा

तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा जे लोक स्वत:ला कमी लेखतात, ते इतरांच्या पार्टनरची चोरी करण्याचा प्रयत्न करतात.

असे लोक आधी मैत्री करतात आणि संधीचा फायदा घेत नात्यात दुरावा निर्माण करतात. कारण त्यांना स्वतःसाठी जोडीदार शोधण्यापेक्षा हे काम सोपे वाटते.