
Tips And Tricks To Celebrate Pet-Friendly Holi 2025: भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आणि पाच दिवसानंतर येणारी रंगपंचमी अगदी उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. परंतु या सगळ्या जल्लोषात आणि आनंद साजरा करण्याच्या गोंधळात बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या पाळीव आणि भटक्या प्राण्यांना विसरून जातो.
त्यांच्यावर या रंगांचा होणारा परिणाम हा घातक असतो. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. जसा आपल्याला रासायनिक रंगांचा धोका असतो तसाच, किंबहुना त्याहून जास्त धोका प्राण्यांना असतो.