Pet Care Tips : पेट ओनर्सच्या घरी Vacuum Cleaner असणं का आवश्यक? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pet Care Tips

Pet Care Tips : पेट ओनर्सच्या घरी Vacuum Cleaner असणं का आवश्यक? जाणून घ्या

Why Pet Owners Should Have Vacuum Cleaner : काही लोक मुलं जन्माला घालण्याऐवजी कुत्रा किंवा, मांजर पाळणं पसंत करतात. काही लोक मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी तर काही लोक आवड म्हणून घरात पाळीव प्राणी पाळतात. पण घरात आणलेल्या लहानशा पिल्लाची खूप काळजी घ्यावी लागते. Pet Parenting हा महत्वाचा मुद्दा ठरतो.

Pet Care Tips

Pet Care Tips

याशिवाय कोणताही प्राणी घरात पाळला तर त्याबरोबर त्यांच्या आणि घरातल्यांच्या हायजिनचीसुध्दा विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं. ज्यांच्या घरात पेट आहे त्यांना ठाऊक असेल की, त्यांचे जागोजागी पडणारे केस, त्यांचा कोंडा, गळालेली लाळ हे सामान्यतः डोळ्यांना पटकन दिसत नाही. पण सोफ्यावर, गादीवर ते पडलेले असतात. याला साफ करण्याचा त्रास पेट पालकांना होत असतो. या स्वच्छतेसाठी व्हॅक्यूमक्लीनर हा सोपा उपाय ठरतो.

काळजी घेतली नाहीतर होणारे दुष्परिणाम

  • यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

  • श्वसनाचे आजार होऊ शकतात.

  • अन्नातून पोटात गेले तर पोटाचे विकार, फूड पॉइझनिंग होऊ शकते.

टॅग्स :petpet animals