

Summer Phone Heating Problem? Use This Trick to Keep Your Device Ice Cool
sakal
उन्हाळा सुरू झाला की उकाडा, ऊन आणि घाम यांचा त्रास वाढतोच, पण त्यासोबत मोबाइल गरम होण्याची समस्या देखील वाढते. अनेक स्मार्टफोन गरम हवामानामुळे पटकन तापतात. फोन जास्त गरम झाला की तो हळू चालू लागतो, बॅटरी लवकर संपते आणि दीर्घकाळात फोनचं नुकसानही होऊ शकतं. पण काही सोप्या सवयी लावल्या तर ही समस्या सहज कमी करता येते.