प्रत्येकांच्या आयुष्यात गेलेले क्षण आणि वेळ आठवण करून देते ते म्हणजे...

photography day
photography day

पुणे : पूर्वी लग्न-समारंभ, छोटे-मोठे घरगुती कार्यक्रम असेल तर त्यावेळेसच त्या आठवणी सांभाळून ठेवण्यासाठी फोटो काढले जायचे. ती फोटोकॉपीही काही दिवसानंतर मिळायची. यामुळे ते फोटो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असायचे. तसेच त्या क्षणाची कधीही आठवण झाली कि आवर्जुन ते फोटो पहिले जात असे, परंतु आजकाल प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आलेले आहेत. 

सध्या जो-तो अगदी लहानातल्या लहान गोष्टी म्हणजे उत्साह, आनंद, उधाण, धमाल, वेदना, दुःख...अशी प्रत्येक भावना फोटोमध्ये क्लिक केली जाते. आपल्या स्मार्टफोनमध्ये कैद करत आहे. त्याच फोटोग्राफीची १८३९ मध्ये सुरुवात झाली. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रेंच सरकारने पेटंट विकत घेतले. या आविष्काराला संपूर्ण जगात मान्यता मिळाली. म्हणूनच १९ ऑगस्ट या दिवशी 'जागतिक छायाचित्र दिन' म्हणून साजरा करतात.  

एक हजार शब्द जे सांगू शकणार नाहीत त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते. वेळेला आणि काळाला थांबवते...ते म्हणजे छायाचित्र. फोटोग्राफी सर्वांच्या आवडीचा छंद. मोबाईलच्या रूपाने सर्वांच्या हातात कॅमेरा आला आहे. फोटोग्राफीच्या प्रेमात एखादा अडकला तर त्याला त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते.

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागत होती. तथापि, या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेन्ट तशीच आहे. आधुनिक तंत्रज्ञानात छायाचित्रणाचे माध्यम बदलले. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल मध्ये टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहत येतात आणि ते सोशल मीडियावर लगेच शेअर केले जात आहे. 

सध्या आता छोटया मोठ्या कार्यक्रमासाठी सर्वत्र फोटोशूटची क्रेझ वाढत आहे. आजच्या डिजिटल जमान्यात फोटोशूट कमी खर्चिक बनल्याने फोटोशूटचा ट्रेण्ड वाढला आहे. जे शब्दात लिहिता येत नाही. जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते. त्यामुळे प्रत्येक क्षण टिपण्यासाठी फोटो काढले जातात. 

शालेय आणि कॉलेज फ्रेंड्स, नातेवाईक एकत्र जमले तर, बर्थडे सेलिब्रेशन, देव दर्शन, पिकनिक, आपल्या जवळच्या व्यक्तींची बऱ्याच दिवसांनी भेट झाल्यास, प्रवास करायला निघाल्यास, आजारी पडल्यास, नवीन ड्रेस परिधान केला तर लगेच काढली जाणारी सेल्फी, हल्ली तर स्मार्टफोन आपल्या हातात कायमच असल्यामुळे जन्मलेल्या बाळाचे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपले जात आहेत. हेच छायाचित्र वर्षांनुवर्षे आठवणींना उजाळा देऊन जातात. काही न बोलता खूप काही बोलून जातात. जुन्या आठवणी ताज्या झाल्या की, नकळत आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते, बरोबर ना... 

फोटो आणि ग्राफ अशा दोन ग्रीक शब्दांच्या मिश्रणातून तयार झालेला शब्द म्हणजे फोटोग्राफी. फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफ म्हणजे चित्र. प्रकाशाच्या मदतीने चित्र तयार करणं म्हणजे फोटोग्राफी. आपल्या प्रत्येकांकडे आणखीन एक नैसर्गिक कॅमेरा आहे ते म्हणजे आपले डोळे. जो कि प्रत्येक क्षण आपल्या डोळ्यात सामावून ठेवतो.

आजकाल तर अगदी लहान घरगुती कार्यक्रम जरी असला तरी लगेच फोटो सेशन केलं जात. प्री वेडींग शुट, एंगेजमेन्ट शूट, मॅरेज शूट, मॅटर्निटी शूट असे एक ना अनेक शूट करण्यासाठी प्री प्लॅनिंग केले जाते. त्यासाठी कोणता दिवस ठरवायचं त्याचे नियोजन, ड्रेसिंग, तयारी, याचे नियोजन करून मेमोरेबल फोटोशूट केलं जात आहे. तसेच हल्ली खूपजण फोटोग्राफी करत असताना पाहावयास मिळत आहेत. आपल्या गल्लीबोळात फोटो स्टुडियो दिसून येत आहे. त्या फोरोग्राफेर्सनाही मागणी वाढलेली आहे.

सिनेमेट्रोग्राफर करण जाधव म्हणाले, मला १५ व्या वर्षांपासून फोटोग्राफीची आवड आहे. मला वाईल्ड फोटोग्राफीमुळे जास्त आवड निर्माण झाली. नेहमीच माणसांच्या हॅप्पीनेससाठी, निसर्गासाठी आणि स्वतःसाठी फोटोशूट करायला आवडतं. फोटो ही अशी गोष्ट आहे कि, त्यामुळे आनंदादायी स्मृती चिरंतन राहू शकतात. जूने फाेटाे पाहिल्यावर आपल्याला उर्जा मिळते. 

सिद्धेश्वर पुजारी-गुरव म्हणाले, मी कॉलेज शिकत असतानाच मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. सुरवातीला निसर्गाचे फोटो काढायचो. आता अनेक वेगवेगळ्या स्टाईलने फोटो काढत आहे. पुढे यातच करिअर करण्याचा माझा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com