Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी
Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी

Bridal Tips : ओव्हरसाईज मुलींनी लग्नात लेहेंगा खरेदी करताना घ्यावी ही काळजी

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. मुलं पाहायला लागल्यापासून मुली मनात लग्वाविषयी अनेक स्वप्न रंगवत असतात. त्यात आपल्याला लग्नातली साडी, लेहेंगा कसा हवा, याविषयीही त्यांनी आधीच ठरवून ठेवलेले असते. लग्न ठरल्यावर मग मुली असे लेहेंगे खरेदी करण्यासाठी किंवा बनवून घेण्यासाठी डिझाईनरकडे धाव घेतात. आधीच सर्व प्लॅनिंग केलेले असल्याने त्यांच्या सौंदर्याला लग्नात चार चांद लागतात. पण ज्या ओव्हरसाईज मुलींना स्वतच्या लग्नात लहेंगा खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Pre Wedding Photoshoot : मुंबई, पुण्याजवळचे 'बेस्ट' स्पॉट्स

कळीदार, घेरदार लेहेंगा नको

जेव्हा मुली लग्नासाठी लेहेंगा खरेदी करतात, तेव्हा साधारपणे त्या कळीदार, घेरदार लेहेंगा खरेदी करतात. पण असे लेहेंगे खूप घेर दाखवत असल्यामुळे जाडी जास्त दिसते. त्यामुळे ओव्हरसाईज मुलींनी लग्नात असे लेहेंगे घेणे टाळावे.

ए लाईन लेहेंगा बेस्ट

जर तुम्ही ओव्हरसाईज असाल तर लग्नासाठी तुम्ही ए लाईन चा लेहेंगा खरेदी करा. त्यात तुम्ही डार्क किंवा लाईट कोणताही रंग निवडू शकता. त्याचबरोबर लेहेंग्यावर भरगच्च एंब्रोयडरी करवून घ्या. तसेच मोठ्या पॅचवर्कपेक्षा नाजूक पॅचवर्कला पसंती द्या.

हेही वाचा: लग्नाची खरेदी करताय? लेहेंगा खरेदी करताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा

दुपट्टा असा वापरा

लेहेंग्याची शान दुपट्ट्यात असते. त्यामुळे तो व्यवस्थित वापरता आला पाहिजे. ओव्हरसाईज असलेल्या मुलींनी हा दुपट्टा नीट पीन लावून वापरावा. असे केल्याने तुमचा लूक परिपूर्ण आणि खूपच सुंदर वाटेल.

असा वापरा ब्लाऊज

ओव्हरसाईज मुलींना त्यांच्या लग्नात बंद गळ्याचा किंवा कमी खोलगट ब्लाऊज घेऊ नये. त्याएेवजी खोल गळ्याचा ब्लाऊज किंवा फुल आणि स्ट्रक्चर्ड ब्लाऊज वापरावा. यामुळे तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल.

हेही वाचा: लग्नापूर्वी नववधूने करावीत 'ही' चार आसने, चेहऱ्यावर येईल 'नॅचरल ग्लो'

loading image
go to top