Positive Attitude : तुमच्याकडेही आहे सुपर पॉवर, वापर कसा करयचा जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Positive Attitude

Positive Attitude : तुमच्याकडेही आहे सुपर पॉवर, वापर कसा करयचा जाणून घ्या...

How To Use Your Own Super Power : तुम्हाला माहितीये, तुमच्याकडे अशी एक शक्ती आहे, जी तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करू शकते. बऱ्याचदा ऐकतो की, आपण जसे विचार करतो तसेच बनतो. त्यामुळेच जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुम्ही तुमच्या इच्छा पुर्ण करू शकतात. जगात आज जेवढेही यशस्वी लोक आहेत, त्यांचं म्हणनं आहे की, त्यांनी आधी जे मिळवायचं त्याची मनोमन इच्छा केली, मग मनानेच ते पूर्ण होत असल्याचं स्वप्न बघितलं, तसे प्रयत्न करत मग ते पुर्ण होतानाचा आनंद अनुभवला. आणि स्वप्न सत्यात उतरलं.

Positive Attitude

Positive Attitude

शाहरुखच्या सिनेमातलं हे वाक्य तर तुम्ही ऐकलंच असेल की, जिस भी चीज को तुम शिद्दत से चाहते हो, पुरी कायनात तुम्हे उससे मिलाने की, कोशिश करती है... किंवा अगदी जब वी मेट सिनेमातलं जो भी तुम अ‍ॅक्च्युअल मे चाहते हो, रियल मे वो तुम्हे मिलतीही है... हे सर्व काय आहे? हिच तुमच्या आतली सुपर पॉवर आहे, सकारात्मक विचारांची.

जसा विचार तुम्ही वारंवार करतात, तसेच बनतात

जर तुम्ही जरा मागे वळून तुमच्या आयुष्याकडे बघितलंत तर तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींचा तुम्ही सतत विचार करतात त्याच तुमच्या आयुष्यात घडत गेल्या आहेत. एकाच गोष्टीवर सतत विचार केल्याने गोष्ट काँशियस माइंड मधून सबकाँशियस माइंडमध्ये जाते. आणि जेव्हा सबकाँशियस माइंडमध्ये एखादी गोष्ट गेल्यावर ती तुमचा ध्यास बनते, आणि मग सत्यात उतरतेच. त्यामुळे तुमच्यातली सकारात्मकता निसर्गातल्या सकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करते आणि ती गोष्ट घडवून आणते.

Positive Attitude

Positive Attitude

जशा भावना तुम्ही पुन्हा पुन्हा कराल तशाच घटना तुमच्यासोबत घडतील

जो व्यक्ती जसा असतो तशाच त्याच्या भावना असतात आणि तशाच घटना त्यांच्यासोबत घडत असतात. काही लोकांना सतत रडत, उदास राहण्याची, नकारात्मक बोलण्याची, विचार करण्याची सवय असते. अशा लोकांसोबतच सारखं वाईट घडतं असंही तुम्ही बघितलं असेल. याच्या अगदी उलटं काही लोक कायम आनंदी राहतात, सकारात्मक असतात. त्यांच्या सोबत चांगलं घडत. याचं कारण चांगलं घडतं म्हणून ते खूश नसतात तर ते खूश असतात त्यामुळे त्यांच्यासोबत चांगलं घडत असतं. म्हणून तर म्हणतात ना, अच्छा सोचो गे तो अच्छा अच्छा होगा...!

जी कल्पना वारंवार कराल तेच आयुष्यात घडेल

ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात हव्या आहेत, त्याच्याशी निगडीत फोटो सतत बघा. त्याविषयीच कल्पना करा. त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. भविष्याविषयी चिंता कराल तर नुकसान होईल. पण कल्पना कराल तर त्या गोष्टी सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळेल. फक्त यात सातत्य असणं फार आवश्यक आहे.

जर पॉझिटीव्ह थिंकींगच्या या गोष्टी तुम्ही मनाशी पक्क्या केल्या तर तुमच्या जीवनात आनंदीच आनंद असेल. सकारात्मक लोकांनाच यश मिळतं. आणि असेच लोक यशस्वी होताना बघायला मिळतात.