यांचं नक्की काय चाललय! आधी चप्पल, आता मसाला चहा परफ्युम? PRADAने लाँच केला ‘चहा-सुगंधी’ परफ्युम; किंमत ऐकून तर वेडेच व्हाल

Masala Chai Turns Luxury: कोल्हापुरी चप्पल वादानंतर आता प्राडाने मसाला चहा सुगंधी परफ्युम सादर केला असून, त्याची किंमत आणि कल्पनेवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Prada Launches Chai-Scented Perfume With Spicy Notes for $190

Prada Launches Chai-Scented Perfume With Spicy Notes for $190

Sakal

Updated on

Prada’s Chai-Scented Perfume Launch: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, कामाचा ताण असो किंवा गप्पा मारताना असो; चहाशिवाय अनेक भारतीयांचा दिवस पूर्ण होत नाही. पण याच चहा प्रेमींना असं सांगितलं की आता चहाचा हाच अनुभव परफ्युमच्या रूपात मिळणार आहे, तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारण कोल्हापुरी चप्पलनंतर, प्रसिद्ध लक्झरी ब्रँड प्राडाने आता चहाच्या वासाचा परफ्युम लाँच केला आहे. आधी कोल्हापुरी चप्पल, नंतर एसटी बसच्या फ्लोरिंगची डिझाईन आणि आता चहा यामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com