MPSC Motivational Story: ‘एमपीएससी’त सलग तीनदा यश!

ज्या समाजात शिक्षणाचे महत्त्व कमी होते, त्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले.
ranjana deshmukh
ranjana deshmukhsakal
Summary

ज्या समाजात शिक्षणाचे महत्त्व कमी होते, त्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. पुढारलेल्या आई-वडिलांच्या विचाराने व मार्गदर्शनाने शिक्षणाची कास धरली.

एमपीएससीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत एकदा नव्हे, सलग तीनदा पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत वर्ग-एकचे अधिकारी म्हणून काम करीत कोणत्याही क्षेत्रात कमी नाही नसल्याचा संदेश राज्यकर जीएसटीच्या उपायुक्त रंजना देशमुख देत आहेत.

Summary

ज्या समाजात शिक्षणाचे महत्त्व कमी होते, त्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले

राजपूत समाजातून पुढे आलेल्या रंजना देशमुख या सध्या छत्रपती संभाजीनगरच्या राज्यकर जीएसटी विभागात प्रशासक विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २६ वर्षांपासून त्या अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

आईच्या आजारपणामुळे आपण डॉक्टर व्हावे आणि आईला बरे करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, वकील होत अनेकांना न्याय देण्याचे काम मुलीने कारावे अशी वडिलांची इच्छा होती.

पुढारलेल्या आई-वडिलांच्या विचारांमुळे स्पर्धा परीक्षेकडे वळल्याचे रंजना देशमुख यांनी सांगितले. १९९६ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. छत्रपती संभाजीनगरात भूमी अभिलेख विभागात तालुका निरीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली.

ranjana deshmukh
Womens Day Special : यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते! व्यवसाय सांभाळत दिला रोजगार

त्या विभागातही मी पहिलीच महिला होते. जमीन मोजणीच्या कामाला गेल्यानंतर अनेकांना अश्‍चर्य वाटायचे. हे कर्तव्य बजावत पुन्हा १९९७ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होत उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून निवड झाली.

मात्र ऑर्डर लवकर न आल्यामुळे पुन्हा १९९८ मध्ये एमपीएससी दिली. त्यानंतर विक्रीकर अधिकारी वर्ग-एक हे पद मिळाले. या पदाचे लेटर येताच डीवायएसपीचेही लेटर आले.

दोन्ही संधी समोर होत्या. मात्र, कुटुंबीयाच्या आग्रहामुळे विक्रीकर अधिकारी पद निवडले आणि पहिली पोस्टिंग बीडला घेतली. तोपर्यंत आईने माझ्याबरोबर माझ्या बहिणीचेही शिक्षण केले. यामुळे तीही आज ठाणे येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे.

लातूर येथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळे त्या कार्यालयास आयएसओ हे नामांकन मिळाले. यासह जीएसटीच्या इमारतीचे विस्तारीकरणात छोटे-छोटी केलेल्या कामांनी इमारतीचे सौंदर्य वाढविले.

त्या ठिकाणी चौकीदार नसल्यामुळे तेथील शिपायांनाच अतिरिक्त काम करावे लागत होते. हा विषय लावून धरल्यामुळे त्या ठिकाणी चार सुरक्षारक्षक नेमण्यात आले. उद्यानही तयार केले. छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर राज्यकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी रेकॉर्ड रुमची जबाबदारी दिली.

- रंजना देशमुख, उपायुक्त, राज्यकर जीएसटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com