झूम : ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पसंतीला उतरतेय...

सर्वत्र वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, वाढलेली वाहतूक कोंडी यांमुळे ग्रामीणपेक्षा शहरी भागात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारना पसंती मिळू लागली आहे.
Automatic transmission
Automatic transmissionsakal
Summary

सर्वत्र वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, वाढलेली वाहतूक कोंडी यांमुळे ग्रामीणपेक्षा शहरी भागात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारना पसंती मिळू लागली आहे.

भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचपैकी जवळपास एक कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची असते. एक जमाना असा होता, की मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारच बाजारात येत असत. कालांतराने कारमध्ये अनेक रचनात्मक बदल घडले. त्यात मॅन्युअलऐवजी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स असलेल्या कार बाजारात येऊ लागल्या. ऑटोमॅटिक गिअर कारबद्दल ग्राहकांमध्ये अनेक भ्रम, संभ्रम होते. पूर्ण कार विक्रीत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचा वाटा केवळ १ ते २ टक्के होता, मात्र हे संभ्रम काही अंशी दूर होत असल्याने आता हे प्रमाण ३५ ते ४० टक्के इतके आहे.

सर्वत्र वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, वाढलेली वाहतूक कोंडी यांमुळे ग्रामीणपेक्षा शहरी भागात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारना पसंती मिळू लागली आहे. याची दखल घेत कार कंपन्यांनी मॅन्युअलच्या जोडीनेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार बाजारात आणल्या. याबाबत किआ इंडियाचे उपाध्यक्ष आणि विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख हरदीप सिंग ब्रार सांगतात, ‘भारतीय बाजारात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही या ट्रेंडचे बारकाईने निरीक्षण केले आणि नवीन ग्राहकांची आवड लक्षात घेऊन आम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार बाजारात आणल्या. परिणामी आमच्या एकूण विक्रीपैकी ३३ टक्के कार या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या असतात.’

किआच्या ग्राहकांना त्रासमुक्तीसाठी ६ एटी, ८ एटी, आयव्हीटी, ७ डीसीटी आदी चार प्रकारच्या ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्याय दिला आहे. त्यात लोकप्रिय ठरलेल्या सेल्टोसमध्ये डीसीटी, ६ एटीसह आयव्हीटीचा पर्याय येतो, तर सोनेट आणि कार्निव्हलमध्ये ७ डीसीटी, ६ एटी; कार्निव्हलमध्ये डिझेल इंजिनसह ८ एटीचा पर्याय उपलब्ध आहे. परिणामी, एकूण कार विक्रीत सेल्टोसच्या प्रत्येक ३ पैकी १, सोनेट ५ पैकी २, केरेन्स ३ पैकी १ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार विक्री होतात. यातील कार्निव्हल केवळ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येते. ऑटोमॅटिक कारबद्दलचे संभ्रम दूर होण्यासाठी काही घटकही कारणीभूत ठरतात.

अधिक वॉरंटी

सध्या अनेक कार कंपन्या आधीच्या तुलनेत संपूर्ण कार, तसेच गिअरबॉक्ससाठी अतिरिक्त वॉरंटी देतात. अनेकांचा असा समज होता, की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचा मेन्टेनन्स खूप असतो, अशा कारचा खर्च डोकेदुखी असते. परंतु अतिरिक्त वॉरंटीमुळे ही समस्या येत नसल्याने अशा कार खरेदीला पसंती मिळत आहे.

किमतीतील फरक

ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन कारच्या किमतीतील फरक १०-१५ वर्षांपूर्वी लाखोंच्या घरात होता, तो आता हजारांवर आला आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही विविध किफायतशीर पर्याय (उदा. किआ/होंडा कारमध्ये दिले जाणारे एटी, डीसीटी, आयव्हीटी, सीव्हीटी आदी) बाजारात आल्याने ऑटोमॅटिक कारला प्राधान्य दिले जात आहे.

फास्ट गिअर शिफ्ट

ओव्हरटेक करताना, घाट रस्ते, शहरी रस्त्यांवर हाताने गिअर कमी-जास्त करणे कसरतीचे व त्रासदायक ठरते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये हा त्रास कमी झाला असला, तरी गिअर शिफ्ट वेगात होत नसल्याने ओव्हरटेक करताना अडचणी येतात. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार कंपन्यांनी विविध ऑटोमॅटिक गिअर प्रकार बाजारात आणल्याने ही समस्याही आता दूर झाली आहे.

फ्युएल इफिशिएंट

मॅन्युअल ट्रान्समिशनच्या तुलनेत ऑटोमॅटिक कार कमी मायलेज देत होत्या, मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवरही बहुतांश कार कंपन्यांनी मात केली आहे. सद्यःस्थिती ऑटोमॅटिक-मॅन्युअल ट्रान्समिशन कारमधील मायलेजचा फरक जास्त राहिलेला नाही, किंबहुना दोन्ही प्रकारातील सारख्याच मायलेज देणाऱ्या कारही बाजारात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com