झूम : बजाज डॉमिनरचा ‘स्वदेशी नजराणा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bajaj dominar bike

टुरिंग अर्थात लाँग ड्राईव्ह बाईक श्रेणीत बजाजच्या डॉमिनरनेही चांगलाच जम बसवला आहे. बजाजची ही अस्सल ‘देशी’ बनावटीची बाईक रस्त्यावरून जात असली, की तिच्या एक्झॉस्टने नजर खेचते.

झूम : बजाज डॉमिनरचा ‘स्वदेशी नजराणा’

टुरिंग अर्थात लाँग ड्राईव्ह बाईक श्रेणीत बजाजच्या डॉमिनरनेही चांगलाच जम बसवला आहे. बजाजची ही अस्सल ‘देशी’ बनावटीची बाईक रस्त्यावरून जात असली, की तिच्या एक्झॉस्टने नजर खेचते. एखाद्या स्पोर्ट्स बाईकला साजेशा असलेल्या एक्झॉस्टने या बाईकच्या लाँग राईडची प्रचंड उत्सुकता होती, ती अखेर पूर्ण झाली. वजनाने अतिशय जड (१९३ किलोग्राम) असलेल्या या बाईकची उत्तम रायडिंग क्वालिटी, ड्युअल चॅनल एबीएस ब्रेक्समुळे तात्काळ नियंत्रित होण्याची मिळणारी हमी या सारख्या डॉमिनरच्या अनेक जमेच्या बाजू आहेत.

डॉमिनरच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास पुढे टुरिंगच्या दृष्टीने मोठा विंड स्क्रीन, एलईडी हेड लँप, टर्न इंडिकेटर; ४३ मिलिमीटरचे यूएसडी सस्पेन्शन दिले आहेत. पाठीमागे मोनो सस्पेन्शन जे हवे तसे ॲडजस्ट करू शकतो; तसेच १५७ मिलिमीटर ग्राऊंड क्लिअरन्स दिला असून जो अतिशय कमी वाटतो. एलईडी टेललँप, ड्युअल बॅरल एक्झॉस्ट, रुंद स्टेप्स सीट या बाईकमध्ये दिले आहेत, ज्यांचे कुशन थोडे दणकट असल्याने लाँग ड्राईव्हला पाठदुखीचा त्रास कमी होतो.

डॉमिनरला दोन्ही रेडियल टायर (१७ एमएम), ३२० एमएमचे पुढील डिस्क ब्रेक, २३० एमएमचे पाठीमागील डिस्क ब्रेक आणि जोडीला ‘एबीएस’ दिल्याने ही बाईक तात्काळ ब्रेक घेते. फक्त ट्रॅक्शन कंट्रोल मिसिंग वाटले. या बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्युएल टँकवर गिअर इंडिकेटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट दिले आहे.

डॉमिनरची सर्वांत आवडलेली बाब म्हणजे टुरिंगच्या हिशेबाने तिची आसनव्यवस्था दिली आहे. बाईकवर बसल्यानंतर पाय खालून ७०-८० डिग्री अँगलमध्ये फोल्ड होतात. त्यामुळे बाईक राईड करताना पाठीवर थेट दाब येत नाही. बाईकचे हँडल बारही सिटिंग पोझिशनला साजेसे सरळ दिल्याने लाँग ड्राईव्हला हात दुखत नाहीत. पुढील आणि पाठीमागील सस्पेन्शन बॅलन्स असल्याने राईड करतानी धक्के जाणवले नाही; परंतु राईड करताना सुरुवातीलाच व्हायब्रेशन्स जाणवतात. अतिवेगात चालवल्यास हँडल बारही व्हायब्रेट होते. इंजिनची ताकद आणि कामगिरीसमोर याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

डॉमिनरल चौथ्या किंवा पाचव्या गिअरवरही चांगला टॉर्क (पिकअप) मिळत असल्याने ओव्हरटेकिंगला कोणतीही समस्या येत नाही. क्लच सॉफ्ट असल्याने शहरातील रस्त्यावर वारंवार क्लच दाबल्याने हात दुखत नाहीत. ही बाईक साधारण २५ ते २८ दरम्यान मायलेज देते. एकूणच ज्यांना ऑफ रोडिंग आणि लाँग टुरिंग करायची आहे, अशा बाईकप्रेमींसाठी डॉमिनॉर ४०० हा चांगला पर्याय ठरू शकतो.

अतिवजनाने चांगली ग्रिप

डॉमिनॉर ४०० मध्ये पॅरामीटर फ्रेम दिल्याने अतिवेगातही तिची हँडलिंग व्यवस्थित करता येते. तिच्या अतिवजनामुळे पूर्ण वेगातही ती रस्त्यावर चांगली ग्रीप पकडते. शिवाय स्टेबल राहते. टुरिंग श्रेणीतील इतर बाईकप्रमाणे डॉमिनॉर हवी तशे टर्न घेता किंवा चालवता येत नाही. बाईकची सीट हाईट ८०० एमएम असल्याने उंचीची समस्या येत नाही. फक्त अधिक वजन सांभाळण्याची क्षमता चालकात हवी.

इंजिन ३७३ सीसी

बजाजने २०१६च्या अखेरीस डॉमिनर ४०० ही टुरिंग बाईक बाजारात दाखल केली. त्यानंतर अनेक बदलही या बाईकमध्ये केले. सध्या या बाईकची एक्स शोरूम किंमत २ लाख २५ हजार आहे. यामध्ये केवळ एकच व्हेरिएंट आणि रंगांचे दोन पर्याय (चारकोल ब्लॅक, अरोरा ग्रीन) दिले आहेत. या बाईकमध्ये ३७३.३ सीसी लिक्विड कूल्ड, ४ स्ट्रोक, ४ वॉल्व्ह इंजिनसह ३ स्पार्क सिस्टिम दिली असून जी ४० पीएस पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क निर्माण करते.

टॅग्स :lifestyleBikePranit Pawar