झूम : वेगवान, आकर्षक ‘ड्युक २५०’

इंजिनचा टिपिकल आवाज, पारंपरिक दुचाकींपेक्षा वेगळं डिझाईन, स्टाईल आणि रंगसंगती; तसंच रस्त्यावरून ‘वायू’वेगात धावणारी बाईक, अशी ‘केटीएम’ची ओळख आहे.
bike duke 250
bike duke 250sakal

इंजिनचा टिपिकल आवाज, पारंपरिक दुचाकींपेक्षा वेगळं डिझाईन, स्टाईल आणि रंगसंगती; तसंच रस्त्यावरून ‘वायू’वेगात धावणारी बाईक, अशी ‘केटीएम’ची ओळख आहे. केटीएमच्या थर्ड जनरेशन ‘ड्युक २५०’ या पूर्णत: नव्या रूपात दाखल झालेल्या बाईकच्या राइडचा नुकताच अनुभव घेतला.

या बाईकची आताच्या तरुणाईत विशेष क्रेझ का आहे, हे डिझाईन, स्टाईल आणि दर्जात्मक राईडमधून लक्षात येते. वजनाने हलकी त्यामुळे तात्काळ मिळणारे नियंत्रण, सुलभ गिअर शिफ्टिंग आदी ‘ड्युक २५०’ची वैशिष्ट्ये आहेत.

क्राफ्टफाहरझ्यूज ट्रंकेनपोल्झ मॅट्टिघोफेन (Kraftfahrzeuge Trunkenpolz Mattighofen) असे ‘केटीएम’चे पूर्ण नाव. ही एक ऑस्ट्रियन मोटारसायकल, सायकल आणि स्पोर्ट्‌स कार उत्पादक कंपनी असली, तरी सध्या पियरर मोबिलिटी एजी (Pierer Mobility AG) आणि भारतातील बजाज ऑटो यांच्याकडे तिची मालकी आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये केटीएमने ‘ड्युक २५०’, ‘ड्युक ३९०’ एकत्रित लाँच केली होती. २०२०मध्ये ‘ड्युक २५०’ पुन्हा नव्या रूपात दाखल झाली होती. आता २०२३ मध्ये ‘ड्युक २५०’ आणि ‘३९०’ ही ॲडव्हेंचर बाईक पुन्हा काही कॉस्मेटिक बदलांसह बाजारात आली आहे.

‘ड्युक २५०’मध्ये सिंगल सिलिंडर, ६ स्पीड गिअर ट्रान्स्मिशनसह २४९.०७ सीसी क्षमतेचे लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे, जे ९,२५० ‘आरपीएम’ ३०.५७ बीएचपी ताकद आणि ७,२५० आरपीएमला २५ एनएम टॉर्क जनरेट करते. तिचा सर्वप्रकारच्या रस्त्यांवर राइडचा अनुभव घेतला.

महामार्गावर विशेषत: टॉप गिअरमध्ये ६००० आरपीएमला ड्युक ‘अस्सल रंग’ दाखवते. क्षणार्धात वेग पकडण्यात ‘ड्युक २५०’ कसलीही कसर सोडत नाही. वेग धारण केल्यावर इंजिनचा बदललेला आवाज राइडमध्ये वेगळी अनुभूती देतो.

‘क्विक शिफ्टर’ने विनाअडथळा राइड

ड्युकमध्ये ५ इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले आहे- ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिला आहे. तसेच राईड-बाय-वायर आणि क्विक-शिफ्टर मानक म्हणून मिळतात. ‘क्विक शिफ्टर’ हे आधुनिक गिअर तंत्र वापरले आहे, ज्याद्वारे क्लच न दाबताही गिअर कमी-जास्त करता येतात. परिणामी कोणताही धक्का न जाणवता, विनाअडथळा राइड होते.

राइडचा आत्मविश्वास

‘ड्युक २५०’मध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. तिचा नवा लूक पहिल्यापेक्षा अधिक आक्रमक आणि तितकाच लक्षवेधी आहे. एजेससह पेट्रोल टाकीचा विस्तार आणि एलईडी हेडलॅम्पसह बाईकचा स्पोर्टिव्ह लूक कायम ठेवला आहे. ग्राफिक्सचा पुरेसा वापर, रंगसंगती, बाईकची उंची, हँडलची लांबी, त्यावरील विविध कंट्रोल्स, बाईकवर बसल्यानंतर पायांची ठेवण, ग्राऊंड क्लिअरसन्स आदी सर्व नियंत्रणात असल्याने राइड करताना आत्मविश्वास मिळतो.

मायलेज, किंमत...

  • ड्युकला १४.५ लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. या बाईकला ४१चे (एआरएआय) मायलेज कंपनीने दिले असला तरी प्रत्यक्ष राईडला प्रतिलिटर ३५च्या आसपास मायलेज तिने दिले.

  • ड्युक २५०ला स्पिल्ट ट्रेलिस फ्रेम, पुढे ४३ एमएमचे डब्ल्यूपी एपेक्स यूएसडी फोर्क्स, पाठीमागे डब्ल्यूपी एपेक्स मोनोशॉक्स सस्पेन्शन दिल्याने राईड आरामदायी होते. हात किंवा कमरेवर दबाव येत नाही.

  • ड्युक २५० ची दिल्ली एक्स शोरूम किंमत २.३९ लाख इतकी आहे. २५० सीसी क्षमतेसह दर्जात्मक राईड आणि वैशिष्ट्यपूर्ण फीचर्समुळे तरुणाईची सर्वांत आवडती म्हणून ड्युक २५० कडे पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com