झूम : ग्रँड आय १० : बजेटमध्ये लक्झुरियस फिल

हॅचबॅक श्रेणीत लोकप्रिय ठरलेली ‘आय १०’ ही कार नवीन वर्षात काही ‘कॉस्मेटिक’ बदल करत ‘ह्युंदाई’ने पुन्हा बाजारात आणली.
grand i10 nios car
grand i10 nios carsakal
Summary

हॅचबॅक श्रेणीत लोकप्रिय ठरलेली ‘आय १०’ ही कार नवीन वर्षात काही ‘कॉस्मेटिक’ बदल करत ‘ह्युंदाई’ने पुन्हा बाजारात आणली.

हॅचबॅक श्रेणीत लोकप्रिय ठरलेली ‘आय १०’ ही कार नवीन वर्षात काही ‘कॉस्मेटिक’ बदल करत ‘ह्युंदाई’ने पुन्हा बाजारात आणली. या कारची (मॅन्युअल ट्रान्समिशन) नुकतीच टेस्ट ड्राइव्ह घेतली. या कारमध्ये वाढीव फीचर्ससह आकर्षक रंगसंगतीमुळे प्रसन्न इंटिरिअर, अधिक रिफाईन्ड इंजिन, १७ ते २१ चे मायलेज देण्याची क्षमता आदी जमेच्या बाजू आहेत.

ग्रँड आय१० निऑस या नावाने बाजारात दाखल झालेल्या या कारची एक्स शोरूम किंमत ५ लाख ६८ हजार ते ८ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. या कारमध्ये एरा, मॅग्ना, स्पोर्ट्‌स, अॅस्टा असे चार व्हेरिएंट्स येतात. ११९७ सीसी क्षमतेचे १.२ लिटर कॅपा पेट्रोल हे एकच इंजिन या कारमध्ये दिले असून, त्यात ‘सीएनजी’चा पर्यायही येतो. हिचे पेट्रोल इंजिन ८३ पीएस पॉवर आणि ११३.८ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५ स्पीड ऑटोमेटिक (एएमटी) आणि मॅन्युअल गिअर ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे.

‘ग्रँड आय १०’चे पुढील ग्रील, पाठीमागील भाग, शिवाय अॅलॉय व्हील्समध्ये बदल केले आहेत. पेंटेड काळ्या रंगाच्या ग्रील्समुळे या कारला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियमनेस आला आहे. फॉग लॅम्पच्या शेजारी दिलेले ‘डीआरएल्स’ अधिक उठावदार दिसतात. १५ इंची ड्युअल टोन अॅलॉय व्हील्समुळे कार अधिक भरदार वाटते. पाठीमागील लूकही तितकाच ‘क्युट’ वाटतो.

कारची अंतर्गत रचना, रंगसंगतीही तितकीच आकर्षक आहे. कारमध्ये २६० लिटर बूटस्पेस मिळतो. कारच्या सीट्स फॅब्रिक आणि लेदरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये येतात. ड्रायव्हरसाठी हाईट अॅडजस्टेबल सीट दिल्याने दृश्यमानतेची समस्या येत नाही. पाठीमागील काचाही पुरेशा आकारात आहेत. पाठीमागेही एसी व्हेंट्स दिल्याने लांबच्या प्रवासात उपयुक्त ठरते.

कार चालवताना इंजिन अधिक रिफाईन्ड वाटते. स्टेअरिंग हाताळणी सुलभ असून, १.२ लिटर पेट्रोल इंजिनमुळे तात्काळ मिळणारा टॉर्क टर्बो इंजिनची फिलिंग देतो. उच्च आरपीएमलाही इंजिन जास्त आवाज करत नाही. या कारची शहरी रस्त्यावर राईड घेतली. आकारमान छोटे असल्याने ड्रायव्हिंगचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे शहरात चालवूनही १६ ते १७ चे मायलेज मिळाले. त्यामुळे ही कार महामार्गावर निश्चितच १९ ते २०चे मायलेज देण्याची क्षमता राखते.

कारमध्ये नवीन काय?

कुल्ड ग्लोव्ह बॉक्स, वायरलेस चार्जर, यूएसबी रेग्युलर आणि सी पोर्ट चार्जिंग सॉकेट, फूटवेल लाईटिंग, ८ इंची टचस्क्रिन इन्फोटन्मेंट सिस्टिम, स्टेअरिंगवर क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस), ४ एअर बॅग, व्हॉईस रेकग्निशन, ऑटोमोटिक हेडलॅम्प, व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग कॅमेरा, चाईल्ट सिट अँकर (आयएसओफिक्स).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com