झूम : कोडियाक सुरक्षित राईडची हमी

युरोपियन कार कंपनी ‘स्कोडा’ने भारतात २०२२च्या सुरुवातीला लाँच केलेली एसयूव्ही श्रेणीतील ‘कोडियाक’ २०२३मध्ये पुन्हा आधुनिक तंत्राची जोड देत बाजारात आणली.
kodiaq car
kodiaq carsakal

युरोपियन कार कंपनी ‘स्कोडा’ने भारतात २०२२च्या सुरुवातीला लाँच केलेली एसयूव्ही श्रेणीतील ‘कोडियाक’ २०२३मध्ये पुन्हा आधुनिक तंत्राची जोड देत बाजारात आणली. भारतात केवळ पेट्रोल इंजिन आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशमध्येच कोडियाक उपलब्ध आहे.

कोडियाकमध्ये स्टाईल, स्पोर्टलाईन आणि लॉरिन अँड क्लेमेंट (एल अँड के) असे तीन व्हेरिएंट्स येतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ३८.५० लाख, ३९.९२ लाख आणि ४१.९५ लाख रुपये इतकी आहे. यापैकी लॉरिन अँड क्लेमेंट व्हेरिएंटची सुमारे १०० किलोमीटर राईड केली.

नवी मुंबईतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि तेथून माथेरानपर्यंतचा कच्चा-पक्का, घाट वळणाचा अशा सर्व प्रकारच्या रस्त्यावर कोडियाकच्या राईडचा अनुभव घेतला. कोडियाकच्या प्रीमियमनेसची अनुभूती तिचा दरवाजा उघडताच येते. त्यानंतर पुढे आतील प्रशस्त भाग (इंटिरियर) त्याला साजेशी रंगसंगती आपले स्वागत करते.

ड्रायव्हिंग सीटवर बसून स्टेअरिंग हातात घेताच कोडियाकच्या सुलभ हाताळणीकडे स्कोडाने भर दिल्याचे लक्षात येते. कोडियाक फूल साईझ एसयूव्ही (१,७९३ किलो वजन) असतानाही स्टेअरिंगची हाताळणी तितकी हलकीही नाही आणि तितकी जडही नाही.

ठराविक ‘आरपीएम’पर्यंत केबिनमध्ये इंजिनचा न येणारा आवाज, ॲक्सिलरेटरवर पाय दिल्यानंतर झटकन् पकडणारा वेग यातून कोडियाकच्या इंजिनच्या ताकदीचा अनुभव येतो. वळणे आणि चढ असलेल्या रस्त्यावर इंजिनमधून पुरेपूर ताकद मिळते.

शहरात वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यात तर ऐटीत धावणारी कोडियाक महामार्गावरही वायू वेगात रस्ता कापते (० ते १०० वेग ७.८ सेकंद). कितीही वेगात पळवली, तरी नियंत्रित राहून रस्त्यावरील पकड मजबूत ठेवते. वेगात वळण घेतानाही रस्ता सोडत नाही. आधुनिक तंत्राने युक्त डायनामिक चेसी आणि गॅस लिक्विड शॉक ॲब्सॉर्बर यांमुळे धक्केविरहित प्रवास होतो.

कोडियाकची आसनव्यवस्था आरामदायी आहे. तरीही सात आसनी कोडियाकमध्ये तिसरी रांग केवळ लहान मुलांना आरामदायी ठरू शकते. तिथे प्रौढ व्यक्तींनी बसणे अडचणीचे ठरू शकते. आसनव्यवस्थेला दमदार वातानुकूलन यंत्रणा आणि कँटनची साऊंड सिस्टिमची जोड असल्याने लांबचा प्रवास सुखद होतो. कोडियाकचे स्टँडर्ड मायलेज प्रतिलिटर किमी/लिटर दिले असले तरी ऑन रोड ती ८ ते १० चे मायलेज देते.

कसे आहे इंजिन?

कोडियाकमध्ये १९८४ सीसी, २ लिटर टीएसआय टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, त्यात ४ सिलिंडर दिले आहेत, जे ६००० आरपीएमला १९० पीएस पॉवर आणि ४,१०० आरपीएमला ३२० एनएम टॉर्क निर्माण करते. यात ४*४ व्हील ड्राईव्ह, टिप्ट्रॉनिक मॅन्युअल गिअर चेंजिंग तंत्राने युक्त डीएसजी, ऑटोमेटिक ७ स्पीड गिअर ट्रान्समिशनचा एकच पर्याय येतो. कोडियाक केवळ पेट्रोल इंजिनमध्येच सादर करण्यात आली आहे.

सुरक्षित प्रवासाची हमी

कोडियाकमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. ‘युरो’ एनकॅपचे ५-स्टार सेफ्टी रेटिंग तिला मिळाले आहेत. भारतासाठी असलेली ‘ग्लोबल एनकॅप’ची चाचणी अद्याप झालेली नाही. ९ एअर बॅग, मल्टी कोलिजन ब्रेक सिस्टिम, टीसीएस अर्थात ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेग्युलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरिन्शियल लॉकिंग सिस्टिम आदी सुरक्षात्मक फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर वैशिष्ट्ये : नेव्हिगेशन सिस्टिमसह २०.३२ सेंटिमीटर इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ३६० अंशातील कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर, ५ ड्राईव्ह मोड, क्रूझ कंट्रोल, पार्क आसिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, पॅनोरमिक सनरूफ, हाईट अँड लेंग्थ ॲडजस्टेबल स्टेअरिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, १२ प्रकारे ॲडजस्ट होणारी ड्रायव्हर सीट, हेडलाईट वॉशर, अम्ब्रेला स्टोरेज कम्पार्टमेंट, माय स्कोडा कनेक्टेड ॲप, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, विंडो सन वायजर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com