झूम : रॉयल एन्फिल्डचा ‘क्लासिक’ वारसा

भटकंती करणाऱ्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या दुचाकींची विशेष क्रेझ आहे. त्यातल्या त्यात रॉयल एन्फिल्डचे ‘क्लासिक-३५०’ मॉडेल पर्यटनविरांची पहिली पसंती ठरते.
Royal Enfield
Royal EnfieldSakal
Summary

भटकंती करणाऱ्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या दुचाकींची विशेष क्रेझ आहे. त्यातल्या त्यात रॉयल एन्फिल्डचे ‘क्लासिक-३५०’ मॉडेल पर्यटनविरांची पहिली पसंती ठरते.

भटकंती करणाऱ्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या दुचाकींची विशेष क्रेझ आहे. त्यातल्या त्यात रॉयल एन्फिल्डचे ‘क्लासिक-३५०’ मॉडेल पर्यटनविरांची पहिली पसंती ठरते. हे क्लासिक मॉडेल रॉयल एन्फिल्डचा वारसा असाच पुढे नेण्यासाठी हातभार लावत आहे. यानिमित्त रॉयल एन्फिल्ड आणि तिच्या क्लासिक ३५०चा प्रवासही जाणून घेऊ या...

रॉयल एन्फिल्डची १९०१मध्ये पहिली दुचाकी बुलेट लंडनमधील एका कार्यक्रमात दाखल करण्यात आली. गेल्या १२१ वर्षांत या कंपनीने अनेक चढ-उतार पाहिले, ज्यामध्ये एक रंजक गोष्ट अशी, की ज्या देशाने जगातील पहिली बुलेट बनवली, त्याच देशाने तिचे उत्पादन बंद केले आहे. जगातील पहिली बुलेट ब्रिटिश सैन्यासाठी तयार करण्यात आली होती. त्यानंतर या दुचाकीला ब्रिटिश सैन्याशिवाय रशियन सरकारनेही खरेदी केल्या. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारत-पाक सीमेवर सुरक्षा वाढवावी लागली. त्यानंतर भारतीय सैनिक आणि पोलिसांसाठी या बुलेट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतातील मद्रास मोटर्सने बुलेटच्या सुट्या भागांची जोडणी (असेंबल) करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी काही तंत्रज्ञांना इंग्लंडमध्ये पाठवले. त्यानंतर भारतात या दुचाकीची जोडणी होऊ लागली. पोलिसांना सुरक्षेसाठी या दुचाकी मिळू लागल्यावर तिची क्रेझ सर्वसामान्यांमध्येही वाढली. ही लोकप्रियता लक्षात घेऊन ‘रॉयल एन्फिल्ड युके’ने भारतात एन्फिल्ड इंडिया’ ही साह्यक कंपनी स्थापन करून चेन्नईत कारखाना उभारला.

दरम्यानच्या काळात युकेमधील रॉयल एन्फिल्ड कंपनी तोट्यात जाऊ लागली. त्यानंतर भारतातच बुलेटचे उत्पादन कायम ठेवले गेले. १९९०मध्ये आयशर या कंपनीने एन्फिल्ड इंडियामध्ये २६ टक्के हिस्सेदारी ठेवून तिची खरेदी केली. आणि १९९९मध्ये एन्फिल्ड इंडियाने कंपनीचे ‘रॉयल एन्फिल्ड असे नामकरण केले. त्यानंतर रॉयल एन्फिल्डच्या अन्य दुचाकीही बाजारात येऊ लागल्या.

‘क्लासिक ३५०’ची क्रेझ

भारतात सद्यःस्थितीत रॉयल एन्फिल्डची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी म्हणून ‘क्लासिक ३५०’ या मॉडेलकडे पाहिले जाते. ही दुचाकी सर्वप्रथम नोव्हेंबर २००९मध्ये बाजारात आली. कारप्रमाणेच दुचाकीतही प्रीमियम सेगमेंट प्रकार असतो, त्यातील ‘प्रीमियम क्रूझर’ श्रेणीत ही ‘क्लासिक ३५०’ गणली जाते. लांबच्या पर्यटनासाठी किंवा साहसी प्रकारासाठी दुचाकीस्वार या गाडीला पसंती देतात. भारताप्रमाणेच जगभरातही ‘क्लासिक ३५०’ची क्रेझ आहे. आकडेवारी पाहिल्यास रॉयल एन्फिल्डने २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशांतर्गत एकूण ५,७३,४३८ युनिट्सची विक्री केली. २०२९-२९च्या तुलनेत ही विक्री केवळ ८७ टक्के होती, तर २०२१-२२मध्ये ५,२१,२३६ युनिट्सची विक्री. या दोन्ही आर्थिक वर्षात निम्मा वाटा केवळ ‘क्लासिक ३५०चा’ आहे.

‘क्लासिक’चे आकर्षण का?

‘क्लासिक ३५०’मध्ये एक वेगळे वैशिष्ट्य आहे जे अनेकांना आकर्षित करते. काहींना तिचे डिझाईन ऐतिहासिक अर्थात रेट्रो प्रकारातील वाटते, तर काहींसाठी ती दुचाकी चालवण्याचा यांत्रिक अनुभव देते. यानंतर तिची रचना अशी केली आहे, जी सर्वप्रकारच्या रस्त्यांवर क्लासिक अनुभव देते. भारतीय बाजारात ३५० श्रेणीत अन्य कंपन्यांच्या दुचाकीदेखील आहेत. परंतु, रॉयल एनफिल्डच्या विश्वासार्हतेमुळे ग्राहक ‘३५० क्लासिक’ला पसंती देतात.

क्लासिक ३५०

व्हेरिएंट्स : ५

इंजिन : सिंगल सिलिंडर, ४ स्ट्रोक,

एअर-ऑइल कूल्ड २०.२१ पीएस पॉवर,

२७ एनएम टॉर्क

मायलेज : ३५ ते ४० किमी/लिटर

किंमत : १.८७ लाख ते २.१८ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com